गप्पेवाडीत महावितरणची हालचाल तात्पुरती मलमपट्टी; कललेले खांब आणि जीर्ण तारा कायम?

बातमीचा धडाका! गप्पेवाडीत महावितरणची धावपळ; तात्पुरत्या दुरुस्तीने ग्रामस्थांमध्ये संताप कायम बीड : केज तालुक्यातील गप्पेवाडी परिसरातील धोकादायक वीजतारा आणि कललेल्या वीजखांबांबाबतची बातमी प्रसिद्ध होताच महावितरण उपकेंद्र विडा प्रशासन अखेर खडबडून जागे झाले. ग्रामस्थांच्या सातत्यपूर्ण तक्रारीनंतर तसेच प्रसारमाध्यमांनी हा प्रश्न ऐरणीवर आणल्यानंतर महावितरण कर्मचाऱ्यांनी गप्पेवाडीतील बाराभाई वस्ती परिसरात तातडीने काही ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपाची दुरुस्ती केली. गेल्या … Read more

अंगणवाडीतील चिमुकल्यांना उष्णतेपासून संरक्षण द्या; उन्हाळी सुट्टीच्या मागणीसाठी लेक लाडकी अभियान आक्रमक

डिजिटल बीड प्रतिनिधी बीड जिल्ह्यात वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर अंगणवाडीतील बालकांना उन्हाळी सुट्टी जाहीर करण्याची मागणी लेक लाडकी अभियानाने केली आहे. बालकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला असून प्रशासनाने तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. बीड : राज्यभर उष्णतेची तीव्र लाट सुरू असताना बीड जिल्ह्यातही तापमानाने उच्चांक गाठण्यास सुरुवात केली आहे. दुपारच्या वेळेत प्रचंड उकाडा … Read more

गप्पेवाडीतील धोकादायक वीजतारांप्रकरणी तहसीलदार श्री अशोक भंडारे सर यांच्याकडे ग्रामस्थांचे निवेदन सादर!

केज डिजीटल बीड प्रतिनिधी केज तालुक्यातील गप्पेवाडी परिसरातील धोकादायक वीजतारांमुळे नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाल्याच्या पार्श्वभूमीवर गप्पेवाडीतील ग्रामस्थांनी तहसीलदार श्री अशोक भंडारे यांच्याकडे निवेदन सादर केले आहे. निवेदनात महावितरण उपकेंद्र विडा यांच्या निष्काळजीपणामुळे गप्पेवाडीतील बाराभाई वस्तीतील अनेक ठिकाणी वीजतारा खाली लोंबकळत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. वारंवार तक्रारी करूनही संबंधित विभागाने कोणतीही ठोस कार्यवाही न … Read more

देश हादरला! नीट पेपरफुटीचा धक्कादायक खुलासा; आता थेट ‘CBI’ करणार प्रकरणाचा तपास?

डिजिटल बीड न्युज NEET Exam Leak News 2026 | Digital Beed Exclusive: देशातील लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी निगडित असलेल्या **NEET UG 2026 परीक्षेबाबत एक अत्यंत खळबळजनक माहिती समोर आली आहे. ३ मे रोजी झालेली ही परीक्षा अखेर रद्द करण्यात आली असून, या प्रकरणाचा तपास आता केंद्राने थेट सीबीआय (CBI) कडे सोपवला आहे. परीक्षेच्या तब्बल ४२ तास … Read more

भेगाळले रस्ते, वाढले अपघात; बीडमध्ये महामार्गांवरून तीव्र आंदोलन नागरिकांचा संताप प्रशासनावर

डिजिटल बीड प्रतिनिधी बीड “ बीडकरांना वेठीस धरणारा मुजोर अभियंता राजेंद्र भोपळे हटाव, बीड जिल्हा बचाव”राष्ट्रीय महामार्गांच्या निकृष्ट कामांविरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने :- डॉ.गणेश ढवळे बीड : (दि.११) बीड जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गांच्या निकृष्ट दर्जाच्या व संथगतीने सुरू असलेल्या कामांविरोधात सामाजिक कार्यकर्ते तथा बीड जिल्हा माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ, महाराष्ट्र राज्याचे मुख्य प्रचार प्रमुख डॉ. गणेश … Read more

​बीड हादरले! रानडुकरांच्या भीषण हल्ल्यात ५ शेतकरी गंभीर जखमी; शिंदी-गप्पेवाडी परिसरात दहशतीचे वातावरण ?

डिजिटल बीड प्रतिनिधी बीडच्या केज तालुक्यात रानडुकरांचा धुमाकूळ; शेतात गेलेल्या शेतकऱ्यांवर जीवघेणा हल्ला. बीड: जिल्हयातील केज तालुक्यातील शिंदी आणि गप्पेवाडी परिसरात रानडुकरांनी उच्छाद मांडला आहे. आज सकाळी शेतात कामासाठी गेलेल्या ५ शेतकऱ्यांवर रानडुकरांच्या कळपाने अचानक भीषण हल्ला केला. या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, शेतकरी नेहमीप्रमाणे … Read more

9-10 दिवस झाले तरी महावितरणचा निष्काळजीपणा कायम!विडा महावितरण कार्यालय झोपेत? गप्पेवाडीतील नागरिक त्रस्त!

डिजिटल बीड प्रतिनिधी /केज गप्पेवाडीतील मृत्यूचा साप बनलेले वीजतार; महावितरणचा बेजबाबदारपणा टोकाला! केज तालुक्यातील गप्पेवाडी गावात बाराभाई वस्ती ते महादेव वस्ती दरम्यान 3-फेज वीजतार अक्षरशः जमिनीवर पडायच्यां अवस्थेत आहेत, आणि वेळोवेळी तक्रार देऊनही महावितरण मात्र गाढ झोपेत आहे! गेल्या अनेक दिवसांपासून ही जीवघेणी परिस्थिती कायम असूनही संबंधित अधिकाऱ्यांनी एकदाही फिरकून पाहिले नाही, ही बाब संतापजनक … Read more

बीड जिल्ह्यात पेट्रोल-डिझेलचा तुटवडा? जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय; साठा करणाऱ्यांना दिला ‘हा’ इशारा!

डिजिटल बीड प्रतिनिधी बीड: गेल्या काही दिवसांपासून बीड जिल्ह्यात इंधनाच्या तुटवड्याबाबत (Petrol-Diesel Shortage) सुरू असलेल्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने आता कंबर कसली आहे. इंधन पुरवठा विस्कळीत होऊ नये आणि नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी पेट्रोल पंप चालक आणि मालकांची तातडीची बैठक घेतली. या बैठकीत इंधन टंचाई दूर करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले … Read more

टायर पंक्चरच्या नावाखाली इंधनाचा काळाबाजार! केज पोलिसांचा विड्यात छापा; मोठा साठा जप्त

डिजीटल बीड प्रतिनिधी केज केज तालुक्यातील विडा येथे टायर वर्कशॉपच्या नावाखाली सुरू असलेल्या बेकायदेशीर इंधन विक्रीच्या अड्ड्यावर केज पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. विनापरवाना पेट्रोल आणि डिझेलची साठवणूक करून चढ्या दराने विक्री करणाऱ्या एका इसमाचा पोलिसांनी पर्दाफाश केला असून, घटनास्थळावरून मोठ्या प्रमाणात मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. काय आहे नेमकं प्रकरण? विडा येथील रहिवासी ईश्वर … Read more

केज शहरात पेट्रोल-डिझेलचा तुटवडा; प्रशासनाने तातडीने लक्ष देण्याची गरज

केज (डिजिटल बीड प्रतिनिधी) बीड जिल्ह्यातील केज शहर आणि परिसरात गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल व डिझेलचा गंभीर तुटवडा निर्माण झाला असून नागरिक, वाहनधारक आणि शेतकरी यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. इंधनाच्या कमतरतेमुळे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले असून अनेक पेट्रोल पंपांवर ‘नो स्टॉक’चे फलक झळकत आहेत. या परिस्थितीमुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे … Read more