गप्पेवाडीतील धोकादायक वीजतारांप्रकरणी तहसीलदार श्री अशोक भंडारे सर यांच्याकडे ग्रामस्थांचे निवेदन सादर!

Spread the love

केज डिजीटल बीड प्रतिनिधी

केज तालुक्यातील गप्पेवाडी परिसरातील धोकादायक वीजतारांमुळे नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाल्याच्या पार्श्वभूमीवर गप्पेवाडीतील ग्रामस्थांनी तहसीलदार श्री अशोक भंडारे यांच्याकडे निवेदन सादर केले आहे.

निवेदनात महावितरण उपकेंद्र विडा यांच्या निष्काळजीपणामुळे गप्पेवाडीतील बाराभाई वस्तीतील अनेक ठिकाणी वीजतारा खाली लोंबकळत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. वारंवार तक्रारी करूनही संबंधित विभागाने कोणतीही ठोस कार्यवाही न केल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

विशेषतः पावसाळ्याच्या काळात मोठा अपघात होण्याची शक्यता लक्षात घेता तात्काळ पाहणी करून धोकादायक वीजतारा दुरुस्त कराव्यात तसेच संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.गावकऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात याव्यात, अशीही मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *