Tuesday, November 10, 2026
Homeविशेष लेखजिवाचीवाडी–चिखलबीड रस्ता बनला मृत्यूचा सापळा; प्रशासन झोपेतच!

जिवाचीवाडी–चिखलबीड रस्ता बनला मृत्यूचा सापळा; प्रशासन झोपेतच!

Spread the love

केज प्रतिनिधी : जिवाचीवाडी ते चिखलबीड या मार्गाची सध्या अत्यंत बिकट अवस्था झाली असून, रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे, उखडलेला रस्ता आणि खराब झालेली वाहतूक व्यवस्था यामुळे नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. आधीच डोंगराळ आणि अवघड भौगोलिक परिस्थिती असलेल्या या मार्गावर रस्त्याची दुरवस्था आणखी गंभीर समस्या बनली आहे.या रस्त्यावरून दररोज दुचाकी, चारचाकी, मालवाहू वाहने तसेच नागरिकांची मोठ्या प्रमाणात ये-जा असते. मात्र रस्त्याची अवस्था पाहता हा मार्ग वाहतुकीसाठी धोकादायक ठरत आहे. परिणामी वाहनचालकांना अपघाताचा धोका निर्माण झाला आहे.

डोंगराचा रस्ता आणि त्यात खड्ड्यांची भर! अशा परिस्थितीत एखाद्या वाहनचालकाचा तोल गेला किंवा वाहन घसरले, तर मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. विशेषतः दुचाकीस्वार, ज्येष्ठ नागरिक आणि विद्यार्थ्यांसाठी हा प्रवास मोठ्या जोखमीचा ठरत आहे.रस्त्याच्या दुरवस्थेबाबत प्रशासनाने तातडीने दखल घेऊन आवश्यक दुरुस्ती करणे अपेक्षित असताना, परिस्थितीकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. रस्ता दुरुस्तीसाठी आणखी किती अपघातांची वाट पाहणार?

असा संतप्त सवाल आता ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे.जिवाचीवाडी–चिखलबीड मार्गाची तातडीने पाहणी करून धोकादायक ठिकाणी खड्डे बुजवणे, रस्त्याची डागडुजी करणे आणि आवश्यक त्या ठिकाणी कायमस्वरूपी उपाययोजना करणे गरजेचे आहे. प्रशासनाने केवळ कागदोपत्री कार्यवाही न करता प्रत्यक्षात काम सुरू करावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.नागरिकांच्या जीवाशी खेळ थांबवा आणि रस्त्याची तातडीने दुरुस्ती करा, अशी जोरदार मागणी आता परिसरातून होत असून, प्रशासन याबाबत काय भूमिका घेते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

digitalbeed
digitalbeedhttp://digitalbeed.in
DigitalBeed.in हे बीड जिल्हा तसेच महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी, स्थानिक बातम्या, सरकारी योजना, शेती, शिक्षण, नोकरी आणि तंत्रज्ञान विषयक माहिती देणारे मराठी डिजिटल न्यूज पोर्टल आहे. आमचे उद्दिष्ट वाचकांपर्यंत अचूक, विश्वासार्ह आणि जलद बातम्या पोहोचवणे आहे. बीड जिल्ह्यातील केज, माजलगाव, अंबाजोगाई, परळी, गेवराई, आष्टी आणि इतर भागातील स्थानिक घडामोडी आम्ही सातत्याने प्रसिद्ध करतो. ताज्या अपडेटसाठी DigitalBeed.in नियमित वाचा आणि आमच्या सोशल मीडियावर देखील जोडलेले राहा.
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

सर्व बातम्या

Recent Comments