Monday, November 9, 2026
Homeमहाराष्ट्रसिकंदराबाद विभागीय रेल्वे प्रवासी समितीवर अमर देशमुख यांची निवड; परिसरातून अभिनंदनाचा वर्षाव!

सिकंदराबाद विभागीय रेल्वे प्रवासी समितीवर अमर देशमुख यांची निवड; परिसरातून अभिनंदनाचा वर्षाव!

Spread the love

केज / प्रतिनिधी : – केज विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) गटाचे अंबाजोगाई तालुकाध्यक्ष अमर देशमुख यांची सिकंदराबाद विभागीय रेल्वे प्रवासी समितीवर सदस्यपदी निवड झाली आहे.

त्यांच्या या निवडीमुळे अंबाजोगाई तालुक्यातील राजकीय वर्तुळातून त्यांचे अभिनंदन होत आहे.खासदार बजरंग बप्पा सोनवणे यांनी सामान्य कार्यकर्त्यावर विश्वास दाखवत सिकंदराबाद विभागीय रेल्वे प्रवासी समितीवर सदस्य म्हणून काम करण्याची संधी दिल्याबद्दल अमर देशमुख यांनी त्यांची भेट घेऊन सत्कार केला व मनःपूर्वक आभार व्यक्त केले.यावेळी माजी आमदार पृथ्वीराज साठे साहेब यांच्यासह मित्रपरिवार उपस्थित होता.

रेल्वे प्रवाशांच्या समस्या, प्रवासी सुविधा, रेल्वे सेवा आणि प्रवाशांच्या हिताच्या प्रश्नांवर समितीच्या माध्यमातून काम करण्याची संधी मिळाल्याने आपण या जबाबदारीला न्याय देण्याचा प्रयत्न करू, अशी भावना अमर देशमुख यांनी व्यक्त केली.

digitalbeed
digitalbeedhttp://digitalbeed.in
DigitalBeed.in हे बीड जिल्हा तसेच महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी, स्थानिक बातम्या, सरकारी योजना, शेती, शिक्षण, नोकरी आणि तंत्रज्ञान विषयक माहिती देणारे मराठी डिजिटल न्यूज पोर्टल आहे. आमचे उद्दिष्ट वाचकांपर्यंत अचूक, विश्वासार्ह आणि जलद बातम्या पोहोचवणे आहे. बीड जिल्ह्यातील केज, माजलगाव, अंबाजोगाई, परळी, गेवराई, आष्टी आणि इतर भागातील स्थानिक घडामोडी आम्ही सातत्याने प्रसिद्ध करतो. ताज्या अपडेटसाठी DigitalBeed.in नियमित वाचा आणि आमच्या सोशल मीडियावर देखील जोडलेले राहा.
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

सर्व बातम्या

Recent Comments