digitalbeed
बीड : दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना ५ हजार रुपये अग्रीम रक्कम वितरित करण्याच्या प्रक्रियेला जिल्हा प्रशासनाकडून गती देण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी आज, १ नोव्हेंबर रोजी तहसील कार्यालय, बीड येथे भेट देऊन सुरू असलेल्या कामकाजाची पाहणी केली.
यावेळी पात्र शेतकऱ्यांच्या याद्यांची तपासणी, लाभार्थ्यांच्या नावांना मंजुरी देणे तसेच अग्रीम रक्कम वितरणाच्या प्रक्रियेचा सविस्तर आढावा घेण्यात आला.पात्र शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी अग्रीम रक्कम मिळावी, यासाठी आवश्यक कार्यवाही वेळेत पूर्ण करून प्रक्रिया गतिमान करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
दिवाळीपूर्वी अग्रीम रक्कम मिळण्याच्या आशेने शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

