Tuesday, November 10, 2026
Homeमहाराष्ट्रमहाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या केज तालुका कार्यकारिणीची निवड जाहीर

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या केज तालुका कार्यकारिणीची निवड जाहीर

Spread the love

केज / प्रतिनिधी : – महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबई शाखा केज तालुका कार्यकारिणीची बैठक गुरुवार, दि. ६ नोव्हेंबर २०२६ रोजी उत्साहात संपन्न झाली. महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे मराठवाडा प्रमुख तथा दैनिक समर्थ राजयोगचे संपादक वैभवजी स्वामी यांच्या आदेशानुसार आयोजित या बैठकीत केज तालुका कार्यकारिणीची सर्वानुमते निवड जाहीर करण्यात आली.

या कार्यकारिणीमध्ये तालुकाध्यक्षपदी चंद्रकांत पाटील, तालुका सचिवपदी दीपक साखरे सर, उपाध्यक्षपदी कृष्णा केदार व संदीप घुगे, कोषाध्यक्षपदी हिराचंद काळे, सहसचिवपदी कमलाकर सोनवणे यांची निवड करण्यात आली.तसेच सदस्यपदी बाबासाहेब शिरसाट, समर्थ पाटील व अविनाश साबळे, वैजनाथ काळे, गोरक्षनाथ रहाणे प्रसिद्धीप्रमुखपदी अमोल शेटे, तर कायदेशीर सल्लागारपदी ॲड. एस. बी. मस्के यांची निवड करण्यात आली.

बैठकीत सर्व पदाधिकाऱ्यांची निवड सर्वानुमते करण्यात आली. नवनिर्वाचित कार्यकारिणीचे उपस्थित पत्रकार बांधवांनी अभिनंदन केले.

तसेच पत्रकारांच्या न्याय्य हक्कांसाठी, पत्रकारांच्या संघटनात्मक बळकटीसाठी आणि पत्रकारांच्या विविध प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी संघटनेच्या माध्यमातून प्रभावीपणे कार्य करण्याचे आवाहन करण्यात आले.

यावेळी नवनिर्वाचित सर्व पदाधिकाऱ्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

digitalbeed
digitalbeedhttp://digitalbeed.in
DigitalBeed.in हे बीड जिल्हा तसेच महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी, स्थानिक बातम्या, सरकारी योजना, शेती, शिक्षण, नोकरी आणि तंत्रज्ञान विषयक माहिती देणारे मराठी डिजिटल न्यूज पोर्टल आहे. आमचे उद्दिष्ट वाचकांपर्यंत अचूक, विश्वासार्ह आणि जलद बातम्या पोहोचवणे आहे. बीड जिल्ह्यातील केज, माजलगाव, अंबाजोगाई, परळी, गेवराई, आष्टी आणि इतर भागातील स्थानिक घडामोडी आम्ही सातत्याने प्रसिद्ध करतो. ताज्या अपडेटसाठी DigitalBeed.in नियमित वाचा आणि आमच्या सोशल मीडियावर देखील जोडलेले राहा.
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

सर्व बातम्या

Recent Comments