केज | प्रतिनिधी
केज तालुक्यातील गप्पेवाडी येथे समस्त गावकरी मंडळी व भजनी मंडळाच्या वतीने अखंड हरिनाम सप्ताह, श्रीमद् भागवत कथा व ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या धार्मिक सोहळ्यामुळे गप्पेवाडी परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण होणार आहे.शनिवार, दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी सप्ताहाचा प्रारंभ होणार असून शनिवार, दि. ५ सप्टेंबर २०२६ रोजी सांगता होणार आहे. सप्ताहादरम्यान विविध कीर्तनकार महाराजांचे कीर्तन, प्रवचन तसेच धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
कार्यक्रमात ह.भ.प. महारूद् महाराज खाडे, ह.भ.प. आप्पासाहेब महाराज चौरे, ह.भ.प. महंत श्रीराम महाराज विडेकर, ह.भ.प. तुकाराम महाराज आंधळे, ह.भ.प. अशोक नंदाजी महाराज, ह.भ.प. बालयोगी हरिहर महाराज आणि ह.भ.प. केशव महाराज गीते शास्त्री यांची कीर्तनसेवा होणार आहे.तसेच दि. ५ सप्टेंबर रोजी ह.भ.प. प्रकाश महाराज साठे यांच्या सकाळी ९ ते ११ वाजेपर्यंत अमृततुल्य काल्याचे कीर्तन व त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
या सप्ताहासाठी भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून धार्मिक कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन समस्त गावकरी मंडळी व भजनी मंडळ, मौजे गप्पेवाडी यांच्या वतीने करण्यात आले आहे

