Tuesday, November 10, 2026
Homeराजकारणसुनील तटकरे यांची आडसकरांच्या निवासस्थानी पदाधिकाऱ्यांसोबत बैठक पदवीधर निवडणुकीची रणनीती ठरली

सुनील तटकरे यांची आडसकरांच्या निवासस्थानी पदाधिकाऱ्यांसोबत बैठक पदवीधर निवडणुकीची रणनीती ठरली

Spread the love

केज/प्रतिनिधी

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे यांनी गुरुवार, दि. १५ ऑक्टोबर रोजी केज येथील ज्येष्ठ नेते रमेशराव आडसकर यांच्या निवासस्थानी भेट देत पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक घेतली. यावेळी मराठवाडा पदवीधर मतदारसंघातील महायुतीचे अधिकृत उमेदवार आमदार सतीश चव्हाण यांच्या प्रचाराची रणनीती आखण्यात आली.

या बैठकीला गेवराईचे माजी आमदार अमरसिंह पंडित आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी ज्येष्ठ नेते रमेशराव आडसकर यांनी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचा सत्कार केला.आमदार सतीश चव्हाण यांनी पदवीधर, शिक्षक, प्राध्यापक आणि बेरोजगारांचे प्रश्न मांडण्यासाठी नेहमीच पुढाकार घेतला आहे.

त्यांना केज मतदारसंघातून मताधिक्य मिळवून देण्यासाठी पदाधिकारी व कार्यकर्ते आघाडीवर राहतील, अशी ग्वाही रमेशराव आडसकर यांनी दिली.या बैठकीला केज कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अंकुश इंगळे, केज नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा डॉ. सीताताई बनसोड, गटनेते हारुणभाई इनामदार, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अमर पाटील, शिवदास थळकरी, गोविंद ससाणे, अरुण धपाटे, लक्ष्मीकांत लाड, कैलास पाटील, सुनील देशमुख, अजहर इनामदार, सुधीर शिंदे, विनोद भांगे, राजेश आगे, संतोष क्षीरसागर यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

digitalbeed
digitalbeedhttp://digitalbeed.in
DigitalBeed.in हे बीड जिल्हा तसेच महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी, स्थानिक बातम्या, सरकारी योजना, शेती, शिक्षण, नोकरी आणि तंत्रज्ञान विषयक माहिती देणारे मराठी डिजिटल न्यूज पोर्टल आहे. आमचे उद्दिष्ट वाचकांपर्यंत अचूक, विश्वासार्ह आणि जलद बातम्या पोहोचवणे आहे. बीड जिल्ह्यातील केज, माजलगाव, अंबाजोगाई, परळी, गेवराई, आष्टी आणि इतर भागातील स्थानिक घडामोडी आम्ही सातत्याने प्रसिद्ध करतो. ताज्या अपडेटसाठी DigitalBeed.in नियमित वाचा आणि आमच्या सोशल मीडियावर देखील जोडलेले राहा.
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

सर्व बातम्या

Recent Comments