Monday, November 23, 2026
HomeUncategorizedखरकटवाडीत बिबट्याची दहशत; ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण

खरकटवाडीत बिबट्याची दहशत; ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण

Spread the love

आष्टी / प्रतिनिधी संदीप सोनवणे

: आष्टी तालुक्यातील देवळाली (पाना) ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या खरकटवाडी येथे गेल्या दहा ते पंधरा दिवसांपासून रात्रीच्या वेळी बिबट्याचा वावर वाढल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बिबट्या वारंवार वस्तीजवळ येत असल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला असून, वनविभागाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.खरकटवाडी ही वस्ती अत्यंत दुर्गम आणि जंगलमय परिसरात वसलेली आहे.

वस्तीजवळ पूर्व दिशेला सामाजिक वनीकरण विभागाचे क्षेत्र, पश्चिमेला जंगलसदृश भाग, उत्तरेला मोठा तलाव, तर दक्षिण दिशेला पुन्हा सामाजिक वनीकरण विभागाचे जंगल आहे. त्यामुळे खरकटवाडीच्या चारही बाजूंनी जंगलाचा परिसर असल्याने वन्यप्राण्यांचा वावर होण्याची शक्यता वाढली आहे.

गेल्या काही दिवसांपासून रात्री-अपरात्री बिबट्या वस्तीजवळ येत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. त्यामुळे रात्रीच्या वेळी घराबाहेर पडणेही नागरिकांसाठी धोकादायक बनले आहे. विशेषतः लहान मुले, महिला, वृद्ध तसेच शेतात जाणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.बिबट्याच्या वाढत्या वावराची दखल घेऊन सामाजिक वनीकरण विभागाच्या वनरक्षकांनी तातडीने परिसराची पाहणी करावी, बिबट्याचा मागोवा घेऊन आवश्यक त्या ठिकाणी पिंजरा लावावा आणि बिबट्याला जेरबंद करून नागरिकांना संरक्षण द्यावे, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

दरम्यान, खरकटवाडीसह परिसरातील जंगलालगत असलेल्या सर्व गावांमध्ये वनविभागाने सतर्कता वाढवून नागरिकांच्या सुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशीही मागणी होत आहे.

Previous article
युवकांच्या हातात झाडू, डोळ्यांसमोर चिमुकल्यांचे निरोगी भविष्य! ग्रामविकास फाउंडेशनचा नांदूर घाटमध्ये प्रेरणादायी उपक्रमग्रामविकास फाउंडेशनच्या युवकांचे श्रमदान; शिक्षक, पालक आणि ग्रामस्थांची साथ, जिल्हा परिषद शाळा झाली स्वच्छ व सुंदर!नांदूर घाट, ता. केज | प्रतिनिधीगावाचा विकास केवळ मोठ्या घोषणा करून होत नाही, तर समाजासाठी निस्वार्थ भावनेने केलेल्या छोट्या-छोट्या कृतीतून घडत असतो. याच विचाराची प्रचिती नांदूर घाट येथे आली आहे. शाळेत शिकणाऱ्या चिमुकल्या विद्यार्थ्यांचे आरोग्य जपले जावे, त्यांना स्वच्छ, सुंदर आणि प्रसन्न वातावरणात शिक्षण घेता यावे, या सामाजिक जाणिवेतून ग्रामविकास फाउंडेशनच्या युवकांनी पुढाकार घेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नांदूर (घाट) येथे स्वच्छता मोहीम राबवली. विशेष म्हणजे, या उपक्रमात शाळेतील शिक्षक, शाळा व्यवस्थापन समिती, पालक आणि ग्रामस्थ यांनीही उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. युवकांच्या श्रमदानातून शाळेचा परिसर स्वच्छ झाला असून, या उपक्रमातून गावासमोर सामाजिक एकजुटीचा आदर्श निर्माण झाला आहे.गेल्या वीस ते पंचवीस दिवसांपासून शाळेला सुट्टी असल्याने वर्गखोल्या, व्हरांडा, पटांगण आणि परिसरात धूळ, पालापाचोळा व कचरा जमा झाला होता. शाळा पुन्हा सुरू होण्याच्या पार्श्वभूमीवर लहान विद्यार्थ्यांना अस्वच्छ वातावरणाचा त्रास होऊ नये, त्यांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ नये आणि शाळेत प्रवेश करताच त्यांचे स्वागत स्वच्छ वातावरणात व्हावे, या उद्देशाने फाउंडेशनच्या युवकांनी प्रत्यक्ष श्रमदानाचा मार्ग स्वीकारला.ग्रामविकास फाउंडेशनच्या युवकांनी राबवलेली कामे- शाळेच्या वर्गखोल्या आणि व्हरांड्याची स्वच्छता.- शाळेचे मुख्य पटांगण आणि संपूर्ण परिसर स्वच्छ केला.- लहान मुलांच्या खेळण्याच्या बागेची साफसफाई केली.- घसरगुंडी, झोपाळे आणि इतर खेळण्यांच्या परिसरातील कचरा हटवला.- विद्यार्थ्यांना स्वच्छ आणि प्रसन्न वातावरण मिळावे यासाठी श्रमदानातून शाळा सज्ज केली.लहानग्यांचे आरोग्य जपणे हीच खरी सामाजिक बांधिलकी!जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिकणारी मुले ही बालवयातील असतात. त्यामुळे त्यांच्या आरोग्याची आणि सुरक्षिततेची काळजी घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. शाळेचा परिसर स्वच्छ असणे म्हणजे केवळ सौंदर्य वाढवणे नव्हे, तर विद्यार्थ्यांना निरोगी वातावरण उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आहे. धूळ, कचरा आणि अस्वच्छता दूर झाल्यामुळे विद्यार्थ्यांना अधिक स्वच्छ व प्रसन्न परिसरात वावरता येणार आहे. या उपक्रमामागे केवळ स्वच्छतेचा हेतू नसून गावातील भावी पिढीच्या आरोग्याची काळजी घेण्याची संवेदनशील भावना आहे.शिक्षकांची साथ, युवकांचा पुढाकार; शाळा आणि समाजाचे नाते अधिक दृढ!विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान देणे एवढीच शिक्षकांची भूमिका नसून त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी चांगले शैक्षणिक वातावरण निर्माण करणेही महत्त्वाचे आहे. ग्रामविकास फाउंडेशनच्या युवकांनी हाती घेतलेल्या या उपक्रमात शिक्षकांनीही सक्रिय सहभाग नोंदवला. शिक्षक आणि युवकांनी एकत्र येऊन केलेले श्रमदान हे शाळा आणि समाज यांच्यातील सहकार्याचे सुंदर उदाहरण ठरले आहे. विद्यार्थ्यांच्या हितासाठी शिक्षक आणि ग्रामस्थ एकत्र आले, तर शाळेच्या विकासाला नवी दिशा मिळू शकते, हा संदेश या उपक्रमातून मिळतो.ग्रामविकास फाउंडेशनचा ध्यास केवळ स्वच्छतेपुरता मर्यादित नाही!ग्रामविकास फाउंडेशन नांदूर घाटच्या युवकांचा उद्देश गावातील सामाजिक प्रश्न सोडवणे, गरजू नागरिकांना शक्य ती मदत करणे, आरोग्य व शिक्षणविषयक उपक्रम राबवणे आणि गावाच्या सर्वांगीण विकासासाठी युवकांना एकत्र आणणे हा आहे. एखाद्या गरजू कुटुंबावर संकट आले, तर मदतीसाठी पुढे येणे आणि सार्वजनिक प्रश्नांवर सामाजिक जबाबदारीने काम करणे, अशा व्यापक दृष्टिकोनातून फाउंडेशन काम करण्याचा प्रयत्न करत आहे.आजच्या काळात युवकांनी केवळ सोशल मीडियावर गावाच्या विकासाच्या चर्चा न करता प्रत्यक्ष मैदानात उतरून काम करण्याची गरज आहे. नांदूर घाटमधील युवकांनी शाळेच्या स्वच्छतेसाठी केलेले श्रमदान ही त्याचीच प्रचिती आहे. गावासाठी वेळ देणारे, समाजातील गरजूंच्या मदतीला धावून जाणारे आणि लहान मुलांच्या आरोग्याचा विचार करणारे युवक हीच गावाची खरी ताकद आहे.आजची स्वच्छता, उद्याच्या आदर्श गावाची पायाभरणी!गावातील शाळा स्वच्छ ठेवणे, विद्यार्थ्यांचे आरोग्य जपणे आणि शिक्षणासाठी चांगले वातावरण निर्माण करणे ही संपूर्ण समाजाची जबाबदारी आहे. ग्रामविकास फाउंडेशनचे युवक, शिक्षक, पालक आणि ग्रामस्थ यांच्या एकत्रित प्रयत्नांतून ही जबाबदारी कृतीत उतरली आहे. शाळेत पुन्हा येणाऱ्या चिमुकल्या विद्यार्थ्यांचे स्वागत स्वच्छ आणि प्रसन्न वातावरणात होणार, हेच या श्रमदानाचे खरे समाधान आहे.युवकांच्या हातातील झाडूने केवळ शाळेचा परिसर स्वच्छ केला नाही, तर समाजाप्रती असलेल्या कर्तव्याची जाणीवही करून दिली. गाव बदलण्याची सुरुवात स्वतःपासून होते, हे नांदूर घाटच्या युवकांनी कृतीतून दाखवून दिले आहे. ग्रामविकास फाउंडेशनच्या या कार्याला आणि त्यांना साथ देणाऱ्या शिक्षकांच्या योगदानाला खऱ्या अर्थाने सलाम!
Next article
शेतकऱ्याच्या घामाला आगीची झळ! स्वतःचा ऊस वाचवताना शेतकरी भाजला; शॉर्टसर्किटमुळे उभा ऊस जळून खाकसातेफळ येथे दुर्दैवी घटना; संजीवन नामदेव कांदे यांचे मोठे आर्थिक नुकसान, शासनाने तातडीने पंचनामा करून मदत द्यावी ता. केज | प्रतिनिधीसातेफळ येथे शेतकऱ्याच्या कष्टावर विजेच्या शॉर्टसर्किटने पाणी फेरल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. शेतातील विद्युत तारांमध्ये शॉर्टसर्किट होऊन उसाच्या उभ्या पिकाला भीषण आग लागली. आपल्या वर्षभराच्या मेहनतीने उभा केलेला ऊस डोळ्यांदेखत जळताना पाहून शेतकरी संजीवन नामदेव कांदे यांनी आग विझवण्यासाठी धाव घेतली. मात्र, स्वतःचा ऊस वाचवण्याच्या प्रयत्नात ते भाजून जखमी झाले. या घटनेमुळे शेतकरी कुटुंबावर मोठे आर्थिक संकट ओढवले आहे.मिळालेल्या माहितीनुसार, सातेफळ येथील शेतकरी संजीवन नामदेव कांदे यांच्या शेतातील उसाच्या पिकाला अचानक आग लागली. शेतातून गेलेल्या विद्युत तारांमध्ये शॉर्टसर्किट होऊन ठिणग्या पडल्याने आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. काही क्षणांतच आगीने रौद्ररूप धारण केले. उसाचे पीक जळू लागल्याचे पाहताच शेतकऱ्याने आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले.मात्र, आगीची तीव्रता इतकी मोठी होती की, आग विझवण्याच्या प्रयत्नात संजीवन कांदे हे स्वतः भाजून जखमी झाले. त्यांच्या अंगाला भाजल्याच्या जखमा झाल्या आहेत. एकीकडे स्वतःच्या जीवाची पर्वा न करता शेतकरी आपले पीक वाचवण्यासाठी धडपडत होता, तर दुसरीकडे वर्षभराच्या कष्टाने वाढवलेला ऊस आगीच्या भक्ष्यस्थानी पडत होता. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.वर्षभराचे कष्ट क्षणात राख; भरपाई कोण देणार?शेतकरी मोठ्या मेहनतीने, खर्च करून आणि कर्ज काढून उसाचे पीक उभे करतात. पाणी, खते, औषधे, मजुरी आणि मशागतीसाठी मोठा खर्च केल्यानंतर हाती येणारे उत्पन्नच त्यांच्या कुटुंबाचा आधार असते. मात्र, अशा दुर्घटनेत उभे पीक जळून खाक झाल्यास शेतकऱ्याला मोठा आर्थिक फटका बसतो. संजीवन कांदे यांच्या बाबतीतही अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे.प्रशासनाने केवळ पंचनामा न करता मदतीचा हात द्यावा!या घटनेची महसूल विभाग, कृषी विभाग आणि महावितरणच्या संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने दखल घेण्याची गरज आहे. जळालेल्या उसाच्या क्षेत्राचा प्रत्यक्ष पंचनामा करून नुकसानीचा योग्य आढावा घ्यावा. तसेच विद्युत शॉर्टसर्किटचे नेमके कारण शोधून संबंधित यंत्रणेने जबाबदारी निश्चित करावी. जखमी शेतकऱ्याला उपचारासाठी आवश्यक मदत आणि नुकसानग्रस्त पिकाची योग्य भरपाई मिळावी, अशी मागणी परिसरातील शेतकरी वर्गातून होत आहे.शेतकऱ्याने पिकवलेला ऊस जळतो, तेव्हा केवळ पीक जळत नाही; तर त्यामागे असलेले वर्षभराचे कष्ट, कर्जाची परतफेड करण्याची आशा आणि कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा आधारही आगीत होरपळतो. त्यामुळे प्रशासनाने या घटनेकडे केवळ एक अपघात म्हणून न पाहता, संकटात सापडलेल्या शेतकऱ्याला तातडीने न्याय आणि आर्थिक आधार द्यावा, हीच अपेक्षा!
digitalbeed
digitalbeedhttp://digitalbeed.in
DigitalBeed.in हे बीड जिल्हा तसेच महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी, स्थानिक बातम्या, सरकारी योजना, शेती, शिक्षण, नोकरी आणि तंत्रज्ञान विषयक माहिती देणारे मराठी डिजिटल न्यूज पोर्टल आहे. आमचे उद्दिष्ट वाचकांपर्यंत अचूक, विश्वासार्ह आणि जलद बातम्या पोहोचवणे आहे. बीड जिल्ह्यातील केज, माजलगाव, अंबाजोगाई, परळी, गेवराई, आष्टी आणि इतर भागातील स्थानिक घडामोडी आम्ही सातत्याने प्रसिद्ध करतो. ताज्या अपडेटसाठी DigitalBeed.in नियमित वाचा आणि आमच्या सोशल मीडियावर देखील जोडलेले राहा.
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

सर्व बातम्या

Recent Comments