केज/प्रतिनिधी
केज तालुक्यातील कुंबेफळ जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा कुंबेफळ केंद्र केज मुलांची ता.केज शाळेतील पहिली ते इ. सातवीच्या विद्यार्थ्यांना डॉ.अशोक दादा थोरात संचालक,महाराष्ट्र राज्य आरोग्य विमा सोसायटी मुंबई यांच्या सुविद्य पत्नी शिवसेना जिल्हाप्रमुख केज, परळी विधानसभा मतदार संघ यांनी शालेय दफ्तर वाटप केले.
श्री राजाभाऊ दत्तात्रय कदम अपग्रेड मुख्याध्यापक जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा कुंबेफळ हे या कार्यक्रमाचे अध्यक्ष होते.कार्यक्रमाचे सुत्र संचलन या शाळेतील प्राथमिक पदवीधर डॉ रामकिशन ग्यानबा मुळे सर यांनी केले. प्रथम क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले. या कार्यक्रमास शिक्षण प्रेमी प्रकाश तुकाराम थोरात,सरपंच अविनाश पांचाळ, विष्णु आबा थोरात, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा सौ. शालु विजय थोरात, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, सेवानिवृत्त शिक्षक श्री. जीवन बापुराव थोरात गुरुजी,सेवा सहकारी सोसायटीचे विद्यमान चेअरमन सुनिल बालासाहेब थोरात, सेवानिवृत्त शिक्षक श्री.उध्दव थोरात,बळीराम थोरात,श्री.ह.भ.प. विष्णु महाराज थोरात, ग्राम पंचायत सदस्य अशोक थोरात व जानुमियाॅं शेख, धोंडीराम थोरात, पांडुरंग थोरात चाच्या, गौतम थोरात,व्यंकटी थोरात,श्रीपती ढोरे, नरसिंग थोरात,सुग्रीव थोरात,आकाश थोरात, बळीराम पांचाळ, आबेद शेख,संदीप थोरात,नंदकिशोर थोरात,गणेश थोरात तसेच या शाळेतील शिक्षक श्री.आकाश दत्तात्रय लोंढे,राहुल बजरंग बचुटे, आबासाहेब तुळशिराम धपाटे,श्रीमती निलावती अनिलकुमार भोरे मॅडम,श्रीमती अंजली गोविंदराव उटीकर मॅडम, अंगणवाडी ताई उषाताई व गावातील अनेक गावकरी,शिक्षण प्रेमी नागरिक उपस्थित होते.
यावेळी प्रकाश बंडु आबा थोरात यांनी शाळेला १० खुर्च्या, सेवा सहकारी सोसायटीचे विद्यमान चेअरमन सुनिल बालासाहेब थोरात यांनी साउंड सिस्टीम भेट दिली.अनेक मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले.शेवटी राहुल बजरंग बचुटे सर यांनी आभार मानले.

