Friday, September 11, 2026
Homeमुख्य बातम्या‘उपचारात हलगर्जीपणा नको’; ससूनमध्ये खा. बजरंग सोनवणे यांनी घेतली संध्या गायकवाड यांची...

‘उपचारात हलगर्जीपणा नको’; ससूनमध्ये खा. बजरंग सोनवणे यांनी घेतली संध्या गायकवाड यांची भेट

Spread the love

केज/प्रतिनिधी

बीड लोकसभा मतदार संघाचे खासदार बजरंग सोनवणे यांनी पुणे येथील ससून रुग्णालयात उपचार घेत असलेल्या संध्या सुरज गायकवाड यांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची आस्थेवाईक पणे विचारपूस केली.

यावेळी खासदार बजरंग सोनवणे यांनी संबंधित डॉक्टरांशी चर्चा करून त्यांच्या उपचाराची माहिती घेतली.तसेच संध्या गायकवाड यांना आवश्यक व योग्य उपचार तातडीने मिळावेत आणि त्यांच्या प्रकृतीची योग्य काळजी घ्यावी,अशा सूचना डॉक्टरांना दिल्या.रुग्णाच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, यासाठी खासदार बजरंग सोनवणे यांनी सदिच्छा व्यक्त केली.

या भेटीबद्दल गायकवाड कुटुंबियांनी खासदार बजरंग सोनवणे यांच्या बद्दल समाधान व्यक्त केले आहे.

digitalbeed
digitalbeedhttp://digitalbeed.in
DigitalBeed.in हे बीड जिल्हा तसेच महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी, स्थानिक बातम्या, सरकारी योजना, शेती, शिक्षण, नोकरी आणि तंत्रज्ञान विषयक माहिती देणारे मराठी डिजिटल न्यूज पोर्टल आहे. आमचे उद्दिष्ट वाचकांपर्यंत अचूक, विश्वासार्ह आणि जलद बातम्या पोहोचवणे आहे. बीड जिल्ह्यातील केज, माजलगाव, अंबाजोगाई, परळी, गेवराई, आष्टी आणि इतर भागातील स्थानिक घडामोडी आम्ही सातत्याने प्रसिद्ध करतो. ताज्या अपडेटसाठी DigitalBeed.in नियमित वाचा आणि आमच्या सोशल मीडियावर देखील जोडलेले राहा.
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

सर्व बातम्या

Recent Comments