Friday, September 11, 2026
Homeवाघे बाभुळगाव-नारेवाडी रस्त्यावर वीज तार चोरी; २३ पोलांवरील २.३४ लाखांची अ‍ॅल्युमिनियम तार...
Array

वाघे बाभुळगाव-नारेवाडी रस्त्यावर वीज तार चोरी; २३ पोलांवरील २.३४ लाखांची अ‍ॅल्युमिनियम तार लंपास

Spread the love

केज/प्रतिनिधी

केज तालुक्यातील वाघे बाभूळगाव विद्युत उप केंद्रापासुन ते नारेवाडी वस्ती रस्त्यावरील ११ के व्ही फीडरच्या २३ विद्युत पोलवरील २ लाख ३४ हजार ३०० रुपयाची ४ हजार २६० मीटर लांबीची अॕल्युमिनियमची तार अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे.

मंगळवार दि.१ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६ ते बुधवार दि.२ सप्टेंबर सकाळी साडे आठ वाजण्याच्या दरम्यान वाघेबाभुळगाव विद्युत उप केंद्रापासून नारेवाडी रस्त्यावरील ११ के व्ही फिडरच्या एकूण २३ विद्युत पोल वरील २ लाख ३४ हजार ३०० रुपयाची अॕल्यूमिनियमची ४ हजार २६० मिटर लांबीची व ६४० किलो तारेची चोरी अज्ञात चोरट्यानी केल्याचे बुधवारी लक्षात आले.या प्रकरणी महा वितरणचे भांडार व्यवस्थापक अमोल जावळे रा.अंबाजोगाई यांनी दिलेल्या फिर्यादी वरून केज पोलीस ठाण्यात अज्ञात चोरा विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक राहुल सूर्यतळ यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार दराडे हॆ पुढील तपास करीत आहेत.

digitalbeed
digitalbeedhttp://digitalbeed.in
DigitalBeed.in हे बीड जिल्हा तसेच महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी, स्थानिक बातम्या, सरकारी योजना, शेती, शिक्षण, नोकरी आणि तंत्रज्ञान विषयक माहिती देणारे मराठी डिजिटल न्यूज पोर्टल आहे. आमचे उद्दिष्ट वाचकांपर्यंत अचूक, विश्वासार्ह आणि जलद बातम्या पोहोचवणे आहे. बीड जिल्ह्यातील केज, माजलगाव, अंबाजोगाई, परळी, गेवराई, आष्टी आणि इतर भागातील स्थानिक घडामोडी आम्ही सातत्याने प्रसिद्ध करतो. ताज्या अपडेटसाठी DigitalBeed.in नियमित वाचा आणि आमच्या सोशल मीडियावर देखील जोडलेले राहा.
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

सर्व बातम्या

Recent Comments