Tuesday, November 24, 2026
Homeमुख्य बातम्यान्यायालयीन कर्मचाऱ्यांच्या ठिय्या आंदोलनास राष्ट्रवादी महिला काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) यांचा जाहीर...

न्यायालयीन कर्मचाऱ्यांच्या ठिय्या आंदोलनास राष्ट्रवादी महिला काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) यांचा जाहीर पाठिंबा

Spread the love

केज/प्रतिनिधी

समान काम समान वेतन या प्रमुख मागणी सह इतर प्रलंबित मागण्यांसाठी केज न्यायालयातील कर्मचाऱ्यांनी सुरू केलेल्या ठिय्या आंदोलनास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार पक्षाच्या बीड जिल्हा महिला आघाडीच्या वतीने जाहीर पाठिंबा देण्यात आला आहे.
महिला जिल्हाध्यक्षा श्रीमती नसरीन बागवान यांनी या संदर्भात अधिकृत पत्रक प्रसिद्ध केले आहे.मंगळवार,दि.१७ नोव्हेंबर २०२६ रोजी केज व अंबाजोगाई येथे न्यायालयीन कर्मचाऱ्यांचे हे आंदोलन सुरू असून, त्यांच्या सर्व न्याय्य मागण्यांना महिला आघाडीने आपला सक्रिय पाठिंबा दर्शवला आहे. सध्याच्या सरकारला जागे करण्यासाठी राज्यातील नोकरदार, व्यावसायिक,शेतकरी, कष्टकरी आणि विद्यार्थ्यांसह सर्वसामान्य जनतेला आंदोलन व उपोषणाचा मार्ग स्वीकारावा लागत आहे,ही अत्यंत खेदाची बाब असल्याचे नसरीन बागवान यांनी आपल्या पत्रकात नमूद केले आहे.न्यायालयीन कर्मचाऱ्यांच्या मागण्यांची शासनाने तातडीने दखल घेऊन त्या मान्य कराव्यात, अशी मागणीही या पत्राद्वारे करण्यात आली आहे.दरम्यान नसरीन बागवान यांनी न्यायालयीन कर्मचारी, महिला कर्मचारी यांच्याशी आस्थेवाईक पणे चौकशी करत आंदोलनांची शासनाने लवकरात लवकर दखल घ्यावी अशी मागणी केली आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

सर्व बातम्या

Recent Comments