Tuesday, November 24, 2026
Homeविशेष लेखअंदमानमध्ये डॉ. वसंत पंडित माळी यांचा शैक्षणिक क्षेत्रातील गौरव

अंदमानमध्ये डॉ. वसंत पंडित माळी यांचा शैक्षणिक क्षेत्रातील गौरव

Spread the love

केज (प्रतिनिधी)

भारत एज्युकेशन सोसायटी संचलित संत गाडगे महाराज कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकॉनॉमिक्स, मुंबईचे प्राचार्य तथा मुंबई विद्यापीठाचे सिनेट सदस्य डॉ. वसंत पंडित माळी यांना यंदाचा प्रतिष्ठेचा ‘अकॅडेमिक एक्सलन्स अवॉर्ड २०२६’ प्रदान करून गौरविण्यात आले. अंदमान-निकोबार बेटांवरील श्री विजयपुरम (पोर्ट ब्लेअर) येथे आयोजित राष्ट्रीय बहुविद्याशाखीय परिषदेत श्रीमती कुसुम चव्हाण व डॉ. अशोक चव्हाण यांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

वनस्पतीशास्त्र विषयातील संशोधन, शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य, प्रशासकीय कौशल्य तसेच प्राचार्य आणि मुंबई विद्यापीठाचे सिनेट सदस्य या जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडताना दिलेले महत्त्वपूर्ण योगदान यांची दखल घेऊन डॉ. माळी यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.छत्रपती संभाजीनगर येथील ‘डॉ. अशोक चव्हाण रिसर्च फाउंडेशन’ (ए. सी. आर. एफ.) आणि कल्याण येथील ‘सोसायटी ऑफ सायन्स, टेक्नॉलॉजी अँड ह्युमॅनिटी’ (एस. एस. टी. एच.) यांच्या संयुक्त विद्यमाने १४ नोव्हेंबर २०२६ रोजी अंदमान-निकोबार बेटांवरील श्री विजयपुरम (पोर्ट ब्लेअर) येथे या विशेष राष्ट्रीय बहुविद्याशाखीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.

“इनोव्हेटिव्ह आयडिया इन दि फील्ड ऑफ सायन्स टेक्नॉलॉजी, सोसियल सायन्स अँड ह्युमॅनिटी – २०२६” या मध्यवर्ती संकल्पनेवर आधारित या परिषदेमध्ये देशभरातील विविध क्षेत्रांतील संशोधक, प्राध्यापक, शास्त्रज्ञ आणि मान्यवर सहभागी झाले होते. या परिषदेचे उद्घाटन बोटॅनिकल सर्व्हे ऑफ इंडिया (बी. एस. आय.),अंदमान व निकोबार प्रादेशिक केंद्राचे अतिरिक्त संचालक तथा प्रमुख डॉ. लालजी सिंग यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले.

यावेळी जवाहरलाल नेहरू राजकीय महाविद्यालय (जे. एन. आर. एम.) येथील वनस्पतीशास्त्र विभागाचे प्रमुख तथा प्रसिद्ध मायकोलॉजिस्ट डॉ. दिपोन शर्मा आणि सहाय्यक संचालक (वित्त) श्रीमती कुसुम चव्हाण हे सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी डॉ. अशोक चव्हाण रिसर्च फाउंडेशनचे अध्यक्ष वरिष्ठ प्रा. डॉ. अशोक चव्हाण यांनी संस्थेची ओळख करून देत अंदमान-निकोबार बेटांवर परिषद आयोजित करण्यामागील उद्देश आणि भूमिका स्पष्ट केली. तसेच परिषदेच्या समारोप सत्राला प्राचार्य नारायण फडके प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

डॉ. वसंत पंडित माळी यांना मिळालेल्या या सन्मानाबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ. सतीश शहा, डॉ. राहुल शहा, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच प्राचार्य एम. एस. कुऱ्हाडे, प्राचार्य डॉ. अनिल सिंह, प्राचार्य डॉ. गणेश भगूरे आणि प्राचार्य डॉ. दिलीप पाटील यांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील शैक्षणिक व संशोधनात्मक वाटचालीस शुभेच्छा दिल्या. डॉ. माळी यांना प्राप्त झालेला हा पुरस्कार त्यांच्या शैक्षणिक, संशोधनात्मक आणि प्रशासकीय कार्याचा गौरव असून, त्यांच्या यशामुळे शैक्षणिक क्षेत्रातून त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

digitalbeed
digitalbeedhttp://digitalbeed.in
DigitalBeed.in हे बीड जिल्हा तसेच महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी, स्थानिक बातम्या, सरकारी योजना, शेती, शिक्षण, नोकरी आणि तंत्रज्ञान विषयक माहिती देणारे मराठी डिजिटल न्यूज पोर्टल आहे. आमचे उद्दिष्ट वाचकांपर्यंत अचूक, विश्वासार्ह आणि जलद बातम्या पोहोचवणे आहे. बीड जिल्ह्यातील केज, माजलगाव, अंबाजोगाई, परळी, गेवराई, आष्टी आणि इतर भागातील स्थानिक घडामोडी आम्ही सातत्याने प्रसिद्ध करतो. ताज्या अपडेटसाठी DigitalBeed.in नियमित वाचा आणि आमच्या सोशल मीडियावर देखील जोडलेले राहा.
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

सर्व बातम्या

Recent Comments