Tuesday, November 24, 2026
Homeबीड जिल्हाबीडमध्ये थरारक अपघात! उसाने भरलेला ट्रक थेट घरात घुसला; घराचे मोठे नुकसान,...

बीडमध्ये थरारक अपघात! उसाने भरलेला ट्रक थेट घरात घुसला; घराचे मोठे नुकसान, जीवितहानी टळली

Spread the love

आष्टी / कार्यकारी संपादक संदीप सोनवणे

बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील धामणगाव येथे एक धक्कादायक अपघात घडला. धामणगाव-पाथर्डी रस्त्यावरील लोखंडे-चौधरी वस्ती परिसरात उसाने भरलेला भरधाव ट्रक थेट दिंगांबर दत्तात्रय औटी यांच्या घरात घुसला.या भीषण धडकेत घराची भिंत, किचन तसेच संसारोपयोगी साहित्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

ट्रकची धडक इतकी जोरदार होती की घराच्या बांधकामाचेही मोठे नुकसान झाले.मात्र, सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली.

अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.घराचे मोठे नुकसान झाल्याने औटी कुटुंबाचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून, झालेल्या नुकसानीची भरपाई मिळावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

digitalbeed
digitalbeedhttp://digitalbeed.in
DigitalBeed.in हे बीड जिल्हा तसेच महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी, स्थानिक बातम्या, सरकारी योजना, शेती, शिक्षण, नोकरी आणि तंत्रज्ञान विषयक माहिती देणारे मराठी डिजिटल न्यूज पोर्टल आहे. आमचे उद्दिष्ट वाचकांपर्यंत अचूक, विश्वासार्ह आणि जलद बातम्या पोहोचवणे आहे. बीड जिल्ह्यातील केज, माजलगाव, अंबाजोगाई, परळी, गेवराई, आष्टी आणि इतर भागातील स्थानिक घडामोडी आम्ही सातत्याने प्रसिद्ध करतो. ताज्या अपडेटसाठी DigitalBeed.in नियमित वाचा आणि आमच्या सोशल मीडियावर देखील जोडलेले राहा.
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

सर्व बातम्या

Recent Comments