केजकरांच्या आरोग्यासाठी ऐतिहासिक पाऊल! आ. नमिता मुंदडा यांच्या पाठपुराव्यातून उपजिल्हा रुग्णालयात अद्ययावत डायलिसिस सेंटरचे लोकार्पण

डिजिटल बीड प्रतिनिधी केज केज विधानसभा मतदारसंघाच्या विकासकामांत आज एक सुवर्णपान जोडले गेले आहे. मतदारसंघातील आरोग्य सुविधा अधिक बळकट करण्याच्या उद्देशाने लोकप्रिय आमदार नमिताताई मुंदडा यांच्या विशेष प्रयत्नातून केज येथील उपजिल्हा रुग्णालयात अत्याधुनिक डायलिसिस सेंटरचे भव्य उद्घाटन आज मोठ्या उत्साहात पार पडले. ​या सुविधेमुळे केज आणि परिसरातील शेकडो किडनी रुग्णांना मोठा दिलासा मिळाला असून, आता … Read more

एकल महिलांच्या सन्मानातून साजरा झाला महाराष्ट्र दिन

महाराष्ट्र दिनानिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हनुमान नगर शाळेत एकल भगिनीच्या हस्ते उत्साहात ध्वजारोहण केज, प्रतिनिधी : –मौजे जोला (ता. केज) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, हनुमान नगर येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त आयोजित कार्यक्रमात एकल भगिनी सुनिता रत्नाकर ढाकणे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.कार्यक्रमाच्या प्रारंभी राष्ट्रध्वजाला मानवंदना देत राष्ट्रगीताचे गायन करण्यात … Read more

१२ वी निकालाची प्रतीक्षा संपली! २ मे रोजी जाहीर होणार निकाल; ‘येथे’ पहा तुमचा रिझल्ट एका क्लिकवर

बीड | DigitalBeed.in महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या इयत्ता १२ वीच्या (HSC) परीक्षेचा निकाल अखेर जाहीर होणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून विद्यार्थी आणि पालकांमध्ये निकालाबाबत असलेली उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे. विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, २ मे रोजी दुपारी १ वाजता हा निकाल ऑनलाइन पद्धतीने जाहीर केला जाणार आहे. … Read more

मस्साजोग पोटनिवडणुकीत मोठा उलटफेर! भावनिक लाट ओसरली; स्वरूपानंद देशमुखांचा झंझावाती विजय, अश्विनी देशमुखांना पराभवाचा धक्का

​केज (डिजिटल बीड) बीड जिल्ह्यातील राजकीयदृष्ट्या अत्यंत संवेदनशील मानल्या गेलेल्या मस्साजोग ग्रामपंचायत सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीचा निकाल आज, २९ एप्रिल रोजी जाहीर झाला. या अटीतटीच्या लढतीत स्वरूपानंद देशमुख यांनी ९२ मतांच्या फरकाने दणदणीत विजय मिळवला आहे. त्यांनी दिवंगत माजी सरपंच संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख यांचा पराभव केला. ही निवडणूक केवळ सत्तेसाठी नव्हती, तर तिला संतोष … Read more

१२ वीचा निकाल आजच? ‘Coming Soon’ मुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता वाढली

महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी जाहीर होण्याची शक्यता; DigiLocker वर ‘Coming Soon’चे संकेत, विद्यार्थ्यांची उत्सुकता शिगेला राज्यातील लाखो विद्यार्थी आणि पालक ज्याची आतुरतेने वाट पाहत आहेत, तो महाराष्ट्र बोर्ड १२ वी (HSC) निकाल 2026 आता कोणत्याही क्षणी जाहीर होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE) लवकरच अधिकृत घोषणा … Read more

राज्यात उष्णतेचा कहर; २९ एप्रिल ते १२ मे दरम्यान हाय अलर्ट, नागरिकांनी घ्यावी विशेष काळजी

डिजिटल बीड प्रतिनिधी राज्यात सध्या उन्हाळ्याचा तीव्र तडाखा जाणवत असून पुढील काही दिवस तापमानात मोठी वाढ होण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. २९ एप्रिल ते १२ मे या कालावधीत विशेषतः दुपारी उष्णतेची तीव्रता अधिक राहणार असून नागरिकांनी सकाळी १० ते दुपारी ३ या वेळेत शक्यतो घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.हवामान … Read more

“रिक्षा बंदीवर राज ठाकरे आक्रमक! ४ मेसाठी दिले मोठे आदेश”

डिजिटल बीड प्रतिनिधी “मराठीसाठी जागत पहारा द्या!” – रिक्षा बंदीच्या विरोधात राज ठाकरे यांचे ठाम निर्देश मुंबईसह राज्यातील काही भागांमध्ये ४ मे रोजी रिक्षा सेवा बंद पाडण्याचा प्रयत्न होणार असल्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा हालचाल वाढली आहे. या संदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांना स्पष्ट आणि ठाम आदेश देत, “मराठीसाठी … Read more

उस्मानाबाद-बीड-लातूर विधान परिषद मतदारसंघात हालचाली; जिल्हा परिषद निवडणुकीची वाट न पाहताच निवडणूक शक्य

बीड | डिजिटल बीड राज्य विधान परिषदेच्या उस्मानाबाद–बीड–लातूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीसंदर्भात महत्त्वाच्या हालचाली सुरू झाल्याची माहिती समोर येत आहे. मागील काही वर्षांपासून रिक्त असलेल्या या जागेबाबत अखेर निवडणूक आयोगाने सक्रिय पावले उचलण्यास सुरुवात केली असून, आगामी काळात निवडणुकीची प्रक्रिया वेगाने पुढे सरकण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे, बीड जिल्हा परिषदेची निवडणूक … Read more

बीड: महेश सहकारी साखर कारखान्याची निवडणूक अविरोध; भीमराव धोंडे गटाचे पुन्हा वर्चस्व

बीड | डिजिटल बीडशेतकऱ्यांची “कामधेनू” म्हणून ओळख असलेल्या बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील महेश सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाची निवडणूक यंदा अविरोध पार पडल्याने संपूर्ण परिसरात समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. सहकार क्षेत्रात महत्त्वाचे स्थान असलेल्या या कारखान्याच्या निवडणुकीत पुन्हा एकदा माजी आमदार भीमराव धोंडे यांच्या गटाने निर्विवाद वर्चस्व सिद्ध करत सत्ता आपल्या ताब्यात कायम ठेवली … Read more

बीडमध्ये बोगस डॉक्टरांवर मोठी कारवाई! जिल्हाधिकाऱ्यांचा कडक आदेश; थेट गुन्हे दाखल होणार

तालुका स्तरावर विशेष तपासणी मोहीम सुरू; नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्यांना आता सुटका नाही बीड जिल्ह्यात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या बोगस डॉक्टरांच्या प्रकरणांनी आता गंभीर वळण घेतले आहे. नागरिकांच्या आरोग्याशी थेट खेळ करणाऱ्या या बेकायदेशीर वैद्यकीय व्यवसायिकांवर आळा घालण्यासाठी प्रशासनाने अखेर कडक पावले उचलण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या महत्त्वाच्या आढावा बैठकीत या संदर्भात अनेक … Read more