केज / प्रतिनिधी : –
येथील केज–धारूर रोडवरील छत्रपती शिवाजी नगर या कॉलनीच्या नामफलकाचे उद्घाटन विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर केज शिवसेनेचे तालुकाप्रमुख पृथ्वीराज (आण्णासाहेब) पाटील यांच्या हस्ते उत्साहात करण्यात आले.
छत्रपती शिवाजी नगरमधील युवकांच्या पुढाकारातून हा उपक्रम राबविण्यात आला. कॉलनीची स्वतंत्र ओळख निर्माण व्हावी आणि परिसराच्या सौंदर्यात भर पडावी, या उद्देशाने नामफलक उभारण्यात आला. या उपक्रमामुळे परिसरातील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले.
यावेळी दत्ता ढगे, मोहन ढाणे, पिनू कुंभार, ज्ञानेश्वर इंगळे, गणेश ठोंबरे, आरुष देवरूषी, बालाजी ढगे, प्राविण्य सत्वधर, दीपक ईगवे, आर्यन चटप, करण ईगवे, आदित्य ढगे, प्रज्वल सोनवणे, गणेश ढाणे आणि भीमाशंकर स्वामी, छोले सर यांच्यासह परिसरातील युवक उपस्थित होते.
नाविन्यपूर्ण उपक्रमांतून युवकांची एकजूट.
केज शहरातील छत्रपती शिवाजी नगरमध्ये नेहमीच विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले जातात. सामाजिक कार्यात पुढाकार घेणाऱ्या येथील युवकांची एकजूट आणि सहकार्याची भावना या उपक्रमातून पुन्हा एकदा दिसून आली. युवकांच्या या एकत्रित प्रयत्नांचे परिसरातून कौतुक होत आहे.

