नवी दिल्ली/प्रतिनिधी
भारतातील ग्रामीण विकास योजनांमध्ये पारदर्शकता आणि उत्तरदायित्व निश्चित करणाऱ्या जिल्हा व तालुका पातळीवरील सामाजिक लेखा परीक्षण (ऑडिट) समन्वयकांच्या मूलभूत मागण्यांसाठी भारतीय जनता मजदूर संघाने (BJMS) आक्रमक भूमिका घेतली आहे.अत्यंत महत्त्वाच्या. जबाबदाऱ्या पार पाडूनही या समन्वयकांना आजही सन्मानजनक मानधन, प्रवास भत्ता,वैद्यकीय सुविधा आणि नोकरी च्या सुरक्षिततेसाठी संघर्ष करावा लागत असल्याची खंत संघटनेने व्यक्त केली आहे.
यागंभीर प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी भारतीय जनता मजदूर संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष शांत प्रकाश जाटव यांच्या वतीने उत्तर प्रदेशच्या मा. मुख्यमंत्र्यांना सविस्तर निवेदन पाठवण्यात आले आहे.याच आशयाचे निवेदन अन्य राज्याचे मुख्यमंत्री यांना देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.या निवेदनाद्वारे समन्वयकांच्या हितासाठी विविध प्रमुख मागण्या सरकार पुढे मांडण्यात आल्या आहेत.
निवेदनातील प्रमुख मागण्या:
सन्मानजनक मानधन:समन्वयकांना त्यांच्या कामाच्या स्वरूपा नुसार सन्मानजनक मासिक मानधन मिळावे आणि ते वेळेवर अदा केले जावे.मानधन वाढ आणि भत्ते: वाढत्या महागाई नुसार दरवर्षी मानधनात योग्य ती वाढ करण्यात यावी, तसेच कामासाठी प्रवास व दैनिक भत्ता लागू करावा.विमा आणि वैद्यकीय संरक्षण:समन्वयकांना आरोग्य, अपघात आणि जीवन विम्याचे कवच देण्यात यावे.
सेवा-सुरक्षा आणि संसाधने:स्पष्ट सेवा-शर्तींसह नोकरीची शाश्वती (सेवा-सुरक्षा) मिळावी आणि कामकाजासाठी आवश्यक संसाधने व सुविधा उपलब्ध करून द्याव्यात.जे कर्मचारी ग्रामीण विकास योजनांमध्ये पारदर्शकता आणण्याचे काम करतात,त्यांच्या स्वतःच्या कार्य जीवनात ही सन्मान, सुरक्षितता आणि आर्थिक स्थैर्य असणे अत्यंत गरजेचे आहे, असे मत शांत प्रकाश जाटव यांनी व्यक्त केले आहे.
कामगार व कर्मचाऱ्यांच्या हक्कांसाठी लोकशाही व घटनात्मक मार्गाने लढा देण्यासाठी संघटना कटिबद्ध असल्याचेही त्यांनी या वेळी स्पष्ट केले.त्यांच्या न्याय हक्कासाठी अन्य राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

