Tuesday, November 24, 2026
HomeUncategorizedमौलाना आझाद संस्थेचा सामाजिक उपक्रम; गरजू कुटुंबांना शिधा किटचे वाटप

मौलाना आझाद संस्थेचा सामाजिक उपक्रम; गरजू कुटुंबांना शिधा किटचे वाटप

Spread the love

केज / नांदुर घाट /प्रतिनिधी संदीप घुगे

दिनांक 15 नोव्हेंबर ,मौजे नाहोली येथे मौलाना आझाद अल्पसंख्यांक बहुउद्देशीय संस्था
, नाहोली व जीनियस इंग्लिश स्कूल, नाहोली यांच्या संयुक्त विद्यमाने आज रविवार, दिनांक १५ नोव्हेंबर २०२६ रोजी गोरगरीब व गरजू कुटुंबांसाठी शिधा किट वाटपाचा सामाजिक उपक्रम उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाची सुरुवात मौलाना आझाद यांच्या प्रतिमेचे पूजन करून सुरुवात करण्यात आली कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान शेख अहमद साहेब यांनी स्वीकारले तसेच प्रस्ताविक संस्थेचे प्राचार्य समाजसेवक शेख रबाणी सर यांनी केले. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून मौजे राजेगाव चे प्रतिष्ठित नागरिक मेटे बापूराव ज्ञानदेव, पत्रकार अमोल सावंत, पालक संतोष शिवाजी मेटे, संजय श्रीधर सोनवणे यांनी आपले स्थान भूषवले.
जयद्रथ आप्पा झाडे, ग्यानबा बिक्कड यांची उपस्थिती होती.
यावेळी जीनियस इंग्लिश स्कूलचे प्राचार्य तथा समाजसेवक शेख रब्बानी सर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. आपल्या मार्गदर्शनपर भाषणात त्यांनी दिवाळी सण हा आनंद, प्रेम, बंधुभाव आणि सामाजिक एकतेचा संदेश देणारा सण असल्याचे सांगितले. समाजातील गोरगरीब व गरजू कुटुंबांच्या चेहऱ्यावर आनंद फुलविण्यासाठी अशा सामाजिक उपक्रमांची नितांत आवश्यकता असल्याचे त्यांनी नमूद केले.
तसेच जीनियस इंग्लिश स्कूलच्या शैक्षणिक वाटचालीवर प्रकाश टाकताना विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण, संस्कार, स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन आणि एक आदर्श नागरिक घडविण्यासाठी शाळा सातत्याने प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले. शिक्षणासोबतच सामाजिक बांधिलकी जपणे ही प्रत्येक संस्थेची जबाबदारी असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले.
या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शेख रेशमा मॅडम, प्रियांका तांदळे मॅडम व सुनील त्रिमुखे सर यांनी विशेष परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन दीपक सारुख सर यांनी केले. उपस्थित मान्यवरांनी संस्थेच्या या सामाजिक उपक्रमाचे कौतुक करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
शिक्षणासोबत समाजसेवेचा वसा जपणाऱ्या मौलाना आझाद अल्पसंख्यांक बहुउद्देशीय संस्था व जीनियस इंग्लिश स्कूल, नाहोली यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात आलेला हा उपक्रम सामाजिक बांधिलकी, माणुसकी आणि सर्वधर्मसमभावाचा सुंदर संदेश देणारा ठरला. मौलाना आझाद हे स्वतंत्र भारताचे पहिले शिक्षण मंत्री होते त्यांनी राजनीती सामाजिक बांधिलकी आणि सर्वधर्मसमभाव या सर्व गोष्टींची जपणूक करत आपलं जीवन अविरत दुसऱ्यांच्या सुखासाठी घालवले त्या संस्थेचा उद्देश लक्षात ठेवून मौलाना आझाद अल्पसंख्यांक बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे नाव ठेवण्यात आले या संस्थेची स्थापना 2015 साली झाली या संस्थेने वृक्षारोपण ,पाणी संवर्धन ,पाणी आडवा पाणी जिरवा, सामाजिक उपक्रमामध्ये सहभाग नोंदवलेला आहे या संस्थेचे उपस्थित मान्यवराने कौतुक केले आहे.
कार्यक्रम आनंदी व उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीरीत्या संपन्न झाला.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

सर्व बातम्या

Recent Comments