Friday, September 11, 2026
Homeबीड जिल्हाकेजमध्ये आगळेवेगळे रक्षाबंधन; पोलिस बंधू-भगिनींना राखी बांधून विद्यार्थ्यांनी दिला स्वच्छतेचा संदेश

केजमध्ये आगळेवेगळे रक्षाबंधन; पोलिस बंधू-भगिनींना राखी बांधून विद्यार्थ्यांनी दिला स्वच्छतेचा संदेश

Spread the love

-केज दि.30 प्रतिनिधी,

बीड जिल्हा ऊसतोड कामगार विकास मंडळ केज संचलित साने गुरुजी निवासी प्रा.मा.उच्च माध्यमिक विद्यालय केज येथील स्काऊट गाईडच्या संघाने शाळेच्या राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त मुख्याध्यापिका प्रा.डॉ. कविता गित्ते-कराड मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली स्काऊट गाईड संघाने केज पोलीस ठाण्यात जाऊन अहोरात्र जनतेची सुरक्षा करणा-या पोलीस बंधु भगिनीना रक्षाबंधनाच्या निमित्त राखी बांधून सुरक्षा बंधन साजरं केलं या वेळी पोलिस निरीक्षक राहुल सुर्यतळ यांच्या उपस्थितीत हा सुरक्षा बंधन साजरा करण्यात आला.

परंपरे नुसार पोलिस उपनिरीक्षक साहेब यांनी ओवाळणी दिली असता स्काऊट गाईड संघाने आम्हाला ही ओवाळणी नको तर त्या बदल्यात पोलीस स्टेशन व आपले केज शहर तसेच सर्वत्र स्वच्छता राखावी अशी अपेक्षा व्यक्त करुन आगळ्या वेगळ्या पद्धतीने स्वच्छतेचा संदेश दिला या प्रसंगी स्काऊट गाईड प्रमुख श्रीमती कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले या मुळे स्वच्छतेचा संदेश प्रत्येक नागरिकाने पाळला पाहिजे असे मत व्यक्त केले.

digitalbeed
digitalbeedhttp://digitalbeed.in
DigitalBeed.in हे बीड जिल्हा तसेच महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी, स्थानिक बातम्या, सरकारी योजना, शेती, शिक्षण, नोकरी आणि तंत्रज्ञान विषयक माहिती देणारे मराठी डिजिटल न्यूज पोर्टल आहे. आमचे उद्दिष्ट वाचकांपर्यंत अचूक, विश्वासार्ह आणि जलद बातम्या पोहोचवणे आहे. बीड जिल्ह्यातील केज, माजलगाव, अंबाजोगाई, परळी, गेवराई, आष्टी आणि इतर भागातील स्थानिक घडामोडी आम्ही सातत्याने प्रसिद्ध करतो. ताज्या अपडेटसाठी DigitalBeed.in नियमित वाचा आणि आमच्या सोशल मीडियावर देखील जोडलेले राहा.
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

सर्व बातम्या

Recent Comments