Friday, September 11, 2026
Homeबीड जिल्हाबीड जिल्ह्यात उबाठा शिवसेनेची संघटनात्मक बैठक; परशुराम जाधव यांच्या उपस्थितीत पदाधिकाऱ्यांचा आढावा

बीड जिल्ह्यात उबाठा शिवसेनेची संघटनात्मक बैठक; परशुराम जाधव यांच्या उपस्थितीत पदाधिकाऱ्यांचा आढावा

Spread the love

केज/प्रतिनिधी : बीड जिल्ह्यातील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या संघटनात्मक बांधणीला वेग देण्यासाठी परळी विधानसभा आणि केज विधानसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक शुक्रवार, २१ ऑगस्ट २०२६ रोजी पार पडली. बीड जिल्हा संपर्कप्रमुख परशुराम जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या बैठकीत आगामी काळातील पक्ष संघटन मजबूत करण्यासह विविध संघटनात्मक विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या आदेशानुसार तसेच शिवसेना नेते अंबादास दानवे, उपनेते तथा मराठवाडा समन्वयक विश्वनाथ नेरुरकर आणि उपनेत्या सुषमा अंधारे यांच्या मार्गदर्शनाखाली ही बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीत बीड जिल्ह्यातील पक्ष संघटनेच्या सद्यस्थितीचा आढावा घेण्यात आला.बैठकीदरम्यान तालुकानिहाय पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून पक्ष संघटनेतील रिक्त पदे भरणे, नवीन शाखाप्रमुखांच्या नियुक्त्या करणे, तसेच बूथ लेव्हल एजंट अर्थात बीएलए नियुक्ती व त्याची पडताळणी याबाबत सविस्तर आढावा घेण्यात आला. आगामी काळात पक्षाची संघटनात्मक ताकद वाढवण्यासाठी प्रत्येक पदाधिकाऱ्याने आपल्या कार्यक्षेत्रात अधिक सक्रियपणे काम करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.महिला आघाडी आणि युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांसोबतही स्वतंत्रपणे चर्चा करण्यात आली.

पक्षाची भूमिका तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचवणे, स्थानिक पातळीवरील नागरिकांचे प्रश्न समजून घेणे आणि त्यासाठी संघटनेच्या माध्यमातून आवाज उठवणे याबाबत पदाधिकाऱ्यांनी आपापली मते मांडली.या बैठकीत पक्षवाढीसाठी प्रत्येक पदाधिकाऱ्याने आपल्या भागातील संघटनात्मक परिस्थितीचा अभ्यास करून प्रत्यक्ष मैदानात काम करण्यावर भर देण्यात आला. आगामी काळात पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या नेतृत्वाला बळ देण्यासाठी बूथ स्तरापासून पक्ष संघटना अधिक मजबूत करण्याचा निर्धार पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

पदाधिकाऱ्यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील कामाचा अहवाल नियमितपणे संपर्कप्रमुखांकडे सादर करण्याबाबतही चर्चा झाली. पक्षाची संघटना केवळ पदांपुरती मर्यादित न राहता सर्वसामान्य नागरिकांशी थेट संपर्क वाढवून मजबूत करण्याची गरज यावेळी व्यक्त करण्यात आली.दरम्यान, बैठकीत पदवीधर नोंदणीच्या विषयावरही सविस्तर चर्चा करण्यात आली. मराठवाडा पदवीधर समन्वयक दिलीपजी घुगे यांनी पदवीधर मतदार नोंदणीबाबत पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. पात्र पदवीधरांपर्यंत पोहोचून नोंदणी प्रक्रिया प्रभावीपणे राबविण्याबाबत यावेळी माहिती देण्यात आली.

बीड जिल्हा संपर्कप्रमुख परशुराम जाधव यांनी पदाधिकाऱ्यांशी संवाद साधताना संघटनात्मक कामाला अधिक गती देण्याची आवश्यकता व्यक्त केली. पक्षाची ताकद ही कार्यकर्त्यांच्या प्रत्यक्ष कामावर अवलंबून असल्याने प्रत्येक पदाधिकाऱ्याने आपल्या भागात सातत्याने जनसंपर्क ठेवून संघटना मजबूत करण्यासाठी प्रयत्न करावेत, असा सूर बैठकीत उमटला.

परळी आणि केज विधानसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीमुळे आगामी काळात बीड जिल्ह्यात शिवसेना (उबाठा) पक्षाच्या संघटनात्मक हालचालींना अधिक वेग येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. शाखास्तरापासून बूथस्तरापर्यंत संघटन मजबूत करण्यासोबतच महिला आघाडी आणि युवासेनेच्या माध्यमातून पक्षाचा जनसंपर्क वाढविण्याच्या दिशेने बैठकीत महत्त्वपूर्ण चर्चा झाली.

या बैठकीस बीड जिल्हा संपर्कप्रमुख परशुराम जाधव, मराठवाडा पदवीधर समन्वयक दिलीपजी घुगे, जिल्हाप्रमुख रत्नाकर शिंदे, युवासेना जिल्हाप्रमुख सोमेश्वर गीते, उपजिल्हाप्रमुख नारायण सातपुते, दीपक मोराळे, जिल्हा समन्वयक अनिल देशमुख, परळी तालुका प्रमुख भोजराज पालीवाड, केज तालुका प्रमुख अशोक जाधव, शहरप्रमुख तात्या रोडे, युवासेना तालुकाप्रमुख किशोर घुले, विधानसभा प्रमुख जगन्नाथ सोळंके, जिल्हा संघटक अशोक गाढवे, अमोल चौधरी यांच्यासह अनेक पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.

यावेळी सूरज वाघमारे, तानाजी धस, उद्धव उगलमुगले, आप्पा कांबळे, सखाराम वायबसे, ज्ञानेश्वर बोबडे, बालासाहेब कसबे, मधुकर अंधारे, दिलीप जाधव, रामभाऊ पवार, दिलीप गालफाडे, दिलीप खाडे, अंगद देशमुख, रमेश देशमुख, ऋषी घुले, प्रभाकर शिंदे, अमोल घुले, निलेश मुरकुटे, गणेश निंगुळे आदी शिवसैनिकांची उपस्थिती होती.

बीड जिल्ह्यातील पक्ष संघटन मजबूत करणे, रिक्त पदांवर नियुक्त्या करणे, शाखास्तरावरील कामाला गती देणे आणि पदवीधर नोंदणीसह बूथस्तरावरील संघटनात्मक तयारी वाढवणे, या प्रमुख मुद्द्यांभोवती ही बैठक केंद्रित राहिली.

digitalbeed
digitalbeedhttp://digitalbeed.in
DigitalBeed.in हे बीड जिल्हा तसेच महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी, स्थानिक बातम्या, सरकारी योजना, शेती, शिक्षण, नोकरी आणि तंत्रज्ञान विषयक माहिती देणारे मराठी डिजिटल न्यूज पोर्टल आहे. आमचे उद्दिष्ट वाचकांपर्यंत अचूक, विश्वासार्ह आणि जलद बातम्या पोहोचवणे आहे. बीड जिल्ह्यातील केज, माजलगाव, अंबाजोगाई, परळी, गेवराई, आष्टी आणि इतर भागातील स्थानिक घडामोडी आम्ही सातत्याने प्रसिद्ध करतो. ताज्या अपडेटसाठी DigitalBeed.in नियमित वाचा आणि आमच्या सोशल मीडियावर देखील जोडलेले राहा.
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

सर्व बातम्या

Recent Comments