*बीड / प्रतिनिधी दिनांक 14 11 2026. राज्यामध्ये दुष्काळामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असून नागपूर कर्जमाफी आंदोलनात घोषणा केल्यानंतर अनेक बँकांनी पीक कर्ज नवे जुने केले आहे राज्यातील कोणत्याही शेतकऱ्याला कर्ज दिले नाही आणि घेतले नाही फक्त कागदावर सह्या अंगठा घेऊन नवे जुने करण्याचे काम बँकाच्या अधिकाऱ्याने केले
ज्या ज्या शेतकऱ्यांना फसवून नवे जुने केले त्या सर्व शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात यावी अशी मागणी ग्रामीण युवक संघटनेचे प्रा. संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक बबनराव आंधळे यांनी केली आहे राज्यातील पीककर्ज घेतलेल्या सर्व शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी ज्या पिकासाठी पीक कर्ज घेतले ते नवीन पीक कापूस सोयाबीन, ऊस, या पिकासाठी पीकासाठी पीक कर्ज दिले ते पीकच दुष्काळामुळे करपून गेल्यामुळे त्यांनी ते पिक कर्ज कसे भरायचे असा गंभीर प्रश्न निर्माण झालेला आहे
यावेळी शेतकरी कर्जमाफी वर चर्चा करण्यात आली कर्जमाफी घोषणा होऊनही पहिल्या यादीतील अनेक शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा झालेले नाहीत ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा झालेले आहेत त्या शेतकऱ्याची बँक खाती बंद करण्यात आलेली आहेत अनेक शेतकरी कर्जमाफी यादीत नाव येऊनही शेतकऱ्यांची खाते होल्ड केल्यामुळे अशा अनेक कर्ज माफी योजना संदर्भात प्रश्न प्रलंबित आहेत हे प्रश्न सोडवून शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी अशी मागणी ग्रामीण युवक संघटनेच्या वतीने होत आहे
ज्या पिकासाठी कर्ज घेतले कापूस सोयाबीन ऊस ते पिकत दुष्काळामुळे करपून गेल्यामुळे शेतकऱ्यांनी पीक कर्ज कसे भरायचे हा मोठा प्रश्न आहे त्यामुळे सरकारने थकीत नियमित सर्व कर्जदार यांचे पीक कर्ज माफ करावे असे आवाहन ग्रामीण युवक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक बबनराव आंधळे यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे द्वारे केले आहे.*

