चौसाळा / प्रतिनिधी दुष्काळात पाण्याचा प्रत्येक थेंब मोलाचा असताना स्वतःच्या शेतीचा विचार वाजूला ठेवून गावकऱ्यांची तहान भागविण्यासाठी तालुक्यातील हिंगणी खुर्द येथील तरुण सरसावले आहेत.
नवनाथ तांदळे यांनी गावासाठी मोफत टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू केला आहे, तर पत्रकार अमोल तांदळे यांनी ऊसाला जाणारे पाणी बंद करून बोअरवेलचे पाणी टँकर भरण्यासाठी उपलब्ध करून दिले आहे. दुष्काळाच्या संकटात तरुणांनी दाखविलेल्या या सामाजिक बांधिलकीचे परिसरातून कौतुक होत आहे.नवनाथ तांदळे यांनी गावातील माता-भगिनी आणि नागरिकांची पाण्यासाठी होणारी वणवण थांबविण्यासाठी मोफत टँकर सुरू करण्याचा निर्णय घेतला. या उपक्रमाचा शुभारंभ तहसीलदार चंद्रकांत शेळके यांच्या हस्ते झाला. अमोल तांदळे यांनी स्वतःच्या शेतातील बोअरवेलचे ऊसासाठी सुरू असलेले पाणी बंद केले आहे. सध्या दोन तास मोफत पाणी देण्याचा निर्णय त्यांनी घेतला असून, ऊसतोडणी झाल्यानंतर गावासाठी किमान चार तास कायमस्वरूपी पाणी देण्याची तयारीही दर्शविली आहे,या उपक्रमाचे चंद्रकांत शेळके यांनी कौतुक करुन मोफत पाणीपुरवठा सुरू केल्याबद्दलनवनाथ तांदळे यांचा सत्कार केला.
यावेळी अमोल तांदळे, माजी सरपंच रमेश तांदळे, वासुदेव आंधळे, भागवत आंधळे, परसराम तांदळे, गणेश आंधळे, मधुकर तांदळे, पोलीस पाटील अशोक नागरगोजे, रावसाहेब तांदळे,राम तांदळे, वामन तांदळे, प्रकाश मुंढे, विजय आंधळे, सूरज बांगर, वामन मुंढे, पिंटू आंधळे, रामदास तांदळे, आया तांदळे, विठ्ठल तांदळे, प्रदीप आंधळे, अजय बांगर, श्रीकृष्ण तांदळे, रामहरी आंधळे, विकास तांदळे, रवींद्र मुंढे,बाळु आंधळे, भानुदास खेडकर, अनिकेत खेडकर, घनश्याम तांदळे, धनराज तांदळे, चंद्रशेन तांदळे आदींसह गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.*गावातील माता-भगिनींचे पाण्यासाठी होणारे हाल थांबविण्यासाठी मोफत टँकर सुरू केला आहे. माझ्यासारख्या इतरांनीही पुढे येऊन शक्य होईल ती मदत करावी. ज्यांच्या विहिरीला किंवा बोअरवेलला पाणी आहे, त्यांनी किमान एक टँकर भरण्यासाठी पाणी मोफत द्यावे.
नवनाथ तांदळे*ऊसापेक्षा गावाची तहान महत्त्वाची*तोडणीला आलेल्या ऊसाचे पाणी बंद करून दोन तास बोअरवेलचे पाणी टँकरसाठी मोफत देत आहे. ऊसतोडणी झाल्यानंतर गावासाठी किमान चार तास कायमस्वरुपी पाणी देण्याचा मानस आहे.


