मुख्यमंत्री बळीराजा शेत-पाणंद रस्ते योजनेला गती; केजसह २५ विधानसभा मतदारसंघांत सह-अध्यक्षांची नियुक्ती !केज विधानसभा मतदारसंघासाठी विजयकांत विक्रमराव मुंडे यांची सह-अध्यक्षपदी नियुक्ती; जिल्हाधिकाऱ्यांना तातडीने कार्यवाहीचे आदेश, ता. केज, जि. बीड | प्रतिनिधी संदीप घुगे : शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत आणि पाणंद रस्त्यांपर्यंत पोहोचण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या मुख्यमंत्री बळीराजा शेत-पाणंद रस्ते योजनेला आता अधिक गती मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या योजनेची गावपातळीवर प्रभावी अंमलबजावणी व्हावी, स्थानिक पातळीवरील अडचणी दूर व्हाव्यात आणि शेतरस्त्यांची कामे मार्गी लागावीत, या उद्देशाने राज्यातील आणखी २५ विधानसभा मतदारसंघांतील क्षेत्रस्तरीय समित्यांवर सह-अध्यक्षांची नियुक्ती करण्यात आली आहे. यामध्ये बीड जिल्ह्यातील केज विधानसभा मतदारसंघाचाही समावेश असून, केजसाठी श्री. विजयकांत विक्रमराव मुंडे यांची सह-अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाने यासंदर्भात १३ नोव्हेंबर २०२६ रोजी शासन निर्णय प्रसिद्ध केला आहे.
RELATED ARTICLES




