Friday, September 11, 2026
Homeदरोड्याच्या तयारीत ११ जणांची टोळी; चौघे केज पोलिसांच्या जाळ्यात, सात जण फरार!
Array

दरोड्याच्या तयारीत ११ जणांची टोळी; चौघे केज पोलिसांच्या जाळ्यात, सात जण फरार!

Spread the love

केज/प्रतिनिधी

केज येथील पोलीस निरीक्षक राहुल सूर्यतळ यांच्या आदेशा वरून शनिवार दि.५ सप्टेंबर रोजी पहाटे ६ वाजण्याच्या दरम्यान केज ते मांजरसुंबा राष्ट्रीय महामार्गावर पेट्रोलिंग करणाऱ्या पथकाला कोरेगाव शिवांरातील कोरेगाव पारधी वस्ती ते भोईटे वस्तीकडे जाणाऱ्या रस्त्यावर दहा ते बारा संशयित आरोपी कपड्याने चेहरा झाकलेल्या अवस्थे मध्ये संशयित रित्या उभे असल्याचे दिसून आले.पोलीस त्यांच्या जवळ येत असल्याचे पाहून,पोलीस पथकाला पाहून संशयित दरोडेखोर पळून जात असताना त्यांचा पाठलाग करून केज पोलिसांनी चौघांना जेरबंद केले आहे.

तर सात संशयित दरोडेखोर शेतातील पिकातून पळून गेले. दरम्यान पोलिसांनी घटनास्थळावरून आठ दुचाकीसह,दुचाकीला लटकविलेले दरोडा टाकण्यासाठी चे लोखंडी तांबी,कोयते, लोखंडी सत्तूर,लोखंडी तलवार,पिवळ्यारंगाची रस्सी,लोखंडी विळा, मिर्ची पावडर,व चेहरा झाकण्यासाठी लाल रंगाचा कपडा असा एकूण ४ लाख ६२ हजार रुपयाचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.या प्रकरणी पोलीस उप निरीक्षक अमिरोद्दीन इनामदार यांच्या फिर्यादीवरून शनिवार दि.५ सप्टेंबर रोजी रात्री उशिरा दरोडा टाकण्याच्या तयारीत असणे,व भारतीय हत्यार कायद्याच्या कलमन्वये अकरा जणांविरुद्ध केज पोलिसात गुन्हा नोंद झाला आहे.

पोलीस निरीक्षक राहुल सूर्यतळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश क्षीरसागर हॆ पुढील तपास करीत आहेत.जेरबंद करण्यात आलेल्या आरोपींमध्ये महादेव कल्याण पवार राहणार कोरेगाव पारधी वस्ती,अशोक मच्छिंद्र पवार कोरेगाव पारधी वस्ती,गणेश कल्याण पवार राहणार कोरेगाव पारधी वस्ती, लहू मोतीराम पवार राहणार कोरेगाव पारधी वस्ती अशा चार संशयित दरोडेखोरांना पोलिसांनी पाठलाग करून जेरबंद केले आहे.पळून गेलेल्या आरोपींमध्ये बबन उर्फ बबलू कल्याण पवार, दादा भागवत पवार, अनिल भागवत पवार, सुरेश उर्फ बप्प्या नवनाथ शिंदे,राम उर्फ नाक्या बाळू पवार सर्वजण राहणार कोरेगाव पारधी वस्ती, सुरज हरिदास काळे राहणार खडी क्रेशर जवळ टाकळी शिवार आणि विलास उर्फ पकल्या सुरेश उर्फ तायडे शिंदे राहणार सांगवी शिवार असे पळून गेलेल्या सात दरोडेखोरांची नावे आहेत.

केज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहुल सूर्यतळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक लक्ष्मण उंबरे,सहाय्यक फौजदार प्रल्हाद चव्हाण,जमादार बाळासाहेब हंकारे, नितीन वारे,राहुल तरकसे व गृहरक्षक दलाचे जवान अनिल वैरागी,सुनील ठोंबरे, आकाश गालफाडे, सचिन जाधव,शिवानंद खरबड,बिबीशन राख, मनोज गायकवाड, सुभाष कदम,दत्तामाने, सुरज भैरट या दरोडा प्रतिबंधक पथकाने ही कार्यवाही मांजरसुंबा ते केज राष्ट्रीय मार्ग लगत कोरेगाव पारधी वस्तीजवळ केली आहे.दरम्यान उर्वरित सात जणांना ताब्यात घेण्याचे आव्हान केज पोलिसांसमोर उभे राहिले आहे.

digitalbeed
digitalbeedhttp://digitalbeed.in
DigitalBeed.in हे बीड जिल्हा तसेच महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी, स्थानिक बातम्या, सरकारी योजना, शेती, शिक्षण, नोकरी आणि तंत्रज्ञान विषयक माहिती देणारे मराठी डिजिटल न्यूज पोर्टल आहे. आमचे उद्दिष्ट वाचकांपर्यंत अचूक, विश्वासार्ह आणि जलद बातम्या पोहोचवणे आहे. बीड जिल्ह्यातील केज, माजलगाव, अंबाजोगाई, परळी, गेवराई, आष्टी आणि इतर भागातील स्थानिक घडामोडी आम्ही सातत्याने प्रसिद्ध करतो. ताज्या अपडेटसाठी DigitalBeed.in नियमित वाचा आणि आमच्या सोशल मीडियावर देखील जोडलेले राहा.
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

सर्व बातम्या

Recent Comments