Friday, September 11, 2026
Homeबीड जिल्हानाहोली ग्रामपंचायतीच्या निधी खर्चाची चौकशी; गटविकास अधिकाऱ्यांचे आदेश

नाहोली ग्रामपंचायतीच्या निधी खर्चाची चौकशी; गटविकास अधिकाऱ्यांचे आदेश

Spread the love

केज/प्रतिनिधी

केज तालुक्यातील नाहोली ग्रामपंचायती चा भ्रष्ट कारभाराची आर्थिक वर्ष २०२२ पासून दि.२२ ऑगस्ट २०२६ पर्यंत प्राप्त झालेला निधी व त्यातून झालेल्या खर्चाची सविस्तर चौकशी करण्याचे आदेश पंचायत समिती केजच्या गटविकास अधिकाऱ्यांनी दिले आहेत.त्यामुळे नाहोली ग्रामपंचायतीच्या आर्थिक व्यवहारां बाबत आता प्रशासकीय पातळीवर चौकशी होणार आहे.नाहोली ग्रामपंचायती ला प्राप्त झालेला १५ वा वित्त आयोगाचा निधी,आमदार फंड, दलित वस्ती स्टेट, दलित वस्ती,जिल्हा नियोजन समिती तसेच इतर सर्व योजनांतून ग्रामपंचायतीला मिळालेला निधी याबाबत सविस्तर माहिती व खर्चाचा तपशील उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली होती.

यासंदर्भात श्री.अजय चंद्रसेन बिक्कड व इतर सर्व राहणार नाहोली,ता.केज यांनी तक्रार अर्ज सादर केला होता.या अर्जाच्या अनुषंगाने पंचायत समिती केज च्या पंचायत विभागाकडून संबंधित अधिकाऱ्यांना पत्र देण्यात आले आहे.तक्रारीतील मुद्यांची चौकशी करण्याचे निर्देशसदर प्रकरणाची चौकशी करून तक्रारी तील नमूद बाबींची सत्यता तपासण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

यासाठी संबंधित तक्रारदारां कडील अभिलेखे व पुरावे तपासून,संपूर्ण चौकशी अहवाल पंचायत समिती कार्यालयास सादर करण्यास सांगण्यात आले आहे.तक्रारीच्या छायांकित प्रती संबंधितांना देण्यात आल्या असून,त्यामध्ये नमूद करण्यात आलेल्या सर्व मुद्द्यांची प्रत्यक्ष कागदपत्रे,नोंदी व उपलब्ध पुराव्यांच्या आधारे पडताळणी करण्यात येणार आहे.

निधीच्या वापराबाबत पारदर्शकतेची अपेक्षाग्रामपंचायतींना विविध विकासकामांसाठी शासनाकडून मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला जातो.हा निधी नियमा नुसार आणि मंजूर कामांसाठीच खर्च होणे अपेक्षित असते. त्यामुळे नाहोली ग्राम पंचायतीच्या मागील काही वर्षांतील निधी प्राप्ती व खर्चाची चौकशी होणार असल्याने ग्रामस्थांचेही या चौकशीच्या अहवालाकडे लक्ष लागले आहे.

चौकशी मध्ये तक्रारीतील आरोप व आक्षेपांची सत्यता स्पष्ट होणार असून,कागदपत्रे व प्रत्यक्ष नोंदींच्या आधारे वस्तुस्थिती समोर येण्याची शक्यता आहे.चौकशी अहवालानंतरच निधीच्या वापराबाबत नेमकी वस्तुस्थिती स्पष्ट होणार आहे.

digitalbeed
digitalbeedhttp://digitalbeed.in
DigitalBeed.in हे बीड जिल्हा तसेच महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी, स्थानिक बातम्या, सरकारी योजना, शेती, शिक्षण, नोकरी आणि तंत्रज्ञान विषयक माहिती देणारे मराठी डिजिटल न्यूज पोर्टल आहे. आमचे उद्दिष्ट वाचकांपर्यंत अचूक, विश्वासार्ह आणि जलद बातम्या पोहोचवणे आहे. बीड जिल्ह्यातील केज, माजलगाव, अंबाजोगाई, परळी, गेवराई, आष्टी आणि इतर भागातील स्थानिक घडामोडी आम्ही सातत्याने प्रसिद्ध करतो. ताज्या अपडेटसाठी DigitalBeed.in नियमित वाचा आणि आमच्या सोशल मीडियावर देखील जोडलेले राहा.
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

सर्व बातम्या

Recent Comments