केज प्रतिनिधी/
बोरीसावरगाव, ता. केज येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका *श्रीमती सुरेखा दत्तात्रय गोरे* यांच्या ३८ वर्षांच्या प्रदीर्घ शैक्षणिक सेवेला सेवापूर्ती सोहळ्यात गौरवपूर्ण निरोप देण्यात आला. शुक्रवार, दि. २८ ऑगस्ट रोजी शाळेच्या प्रांगणात हा सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.श्रीमती सुरेखा गोरे यांनी आपल्या *३८ वर्षांच्या सेवाकाळात हजारो विद्यार्थ्यांना ज्ञानदान करत शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिले.* विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसोबतच त्यांच्या संस्कार, शिस्त आणि सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकासावर त्यांनी विशेष भर दिला. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी त्यांनी केलेले कार्य कौतुकास्पद असून, त्यांच्या कार्याचा ठसा अनेक विद्यार्थ्यांच्या जीवनावर उमटला आहे.सेवापूर्ती सोहळ्यास विविध मान्यवर, शिक्षण विभागातील अधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, ग्रामस्थ, पालक, माजी विद्यार्थी आणि शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य उपस्थित होते.
मान्यवरांच्या हस्ते श्रीमती गोरे यांचा शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी उपस्थित मान्यवरांनी श्रीमती गोरे यांच्या प्रदीर्घ सेवाकार्याचा गौरव करत त्यांच्या कर्तव्यनिष्ठा, शिस्तप्रियता आणि विद्यार्थ्यांप्रती असलेल्या आपुलकीचा विशेष उल्लेख केला.
*शिक्षक म्हणून सुरू झालेला प्रवास मुख्याध्यापिका पदापर्यंत पोहोचवत ३८ वर्षांची ज्ञानसेवा पूर्ण करणाऱ्या सुरेखा गोरे यांना उपस्थितांनी निरोप दिला.*या प्रसंगी त्यांच्या सहकाऱ्यांनी व विद्यार्थ्यांनी जुन्या आठवणींना उजाळा देत मनोगत व्यक्त केले. सेवापूर्ती म्हणजे सेवेला पूर्णविराम नसून, आयुष्याच्या नव्या पर्वाची सुरुवात असल्याचे सांगत उपस्थितांनी त्यांना निरोगी, आनंदी आणि सुखी भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.३८ वर्षांचा ज्ञानदानाचा प्रवास, असंख्य विद्यार्थ्यांचे घडविलेले आयुष्य आणि शिक्षण क्षेत्रातील योगदान यामुळे सुरेखा गोरे यांच्या सेवेला हा सोहळा खऱ्या अर्थाने मानाचा मुजरा ठरला.
यावेळी बीड लोकसभेचे खासदार बजरंग बप्पा सोनवणे व केज विधान मतदार संघाचे आमदार नमिताताई मुंदडा तसेच गटशिक्षण अधिकारी सुनिल केंद्रेकर सामाजिक कार्यकर्ते युवराज काका काकडे युवराज दादा गोरे जयचंद धायगुडे दिलीप गोरेमाळी औरंगपुर गावचे माजी सरपंच सुधीर रानमारे गजानन गोरे माळी आदी मान्यवर उपस्थित होते

