Friday, September 11, 2026
HomeUncategorizedस्व. विश्वंभर (काका) कोकिळ यांच्या ९व्या पुण्यस्मरणानिमित्त भव्य वक्तृत्व स्पर्धा; आवनी गिते...

स्व. विश्वंभर (काका) कोकिळ यांच्या ९व्या पुण्यस्मरणानिमित्त भव्य वक्तृत्व स्पर्धा; आवनी गिते व अरोही धोतरे प्रथम

Spread the love

.

केज प्रतिनिधी: दि. २३ ऑगस्ट-*

जीवन विकास शिक्षण मंडळ, केज तसेच कोकिळ परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने जीवन विकास शिक्षण मंडळ संस्थेचे संस्थापक सचिव स्व. विश्वंभर ( काका ) कोकिळ यांच्या ९ व्या पुण्यस्मरणार्थ मराठवाडा पातळीवरील भव्य शालेय वक्तृत्व स्पर्धा केज येथील स्वामी विवेकानंद विद्यामंदीर [ माध्यमिक विभाग ] या शाळेमध्ये दि. २२ ऑगस्ट २०२५ वार शनिवार रोजी पार पडली. या स्पर्धेमध्ये लहान गटातून आदर्श प्राथमिक विद्यालय घाटनांदुर या शाळेची आवनी सूर्यकांत गिते तर मोठ्या गटातून जनता माध्यमिक विद्यालय धारूर या शाळेची अरोही बालासाहेब धोतरे या विद्यार्थिनींनी सर्वप्रथम येण्याचा बहुमान मिळविला.

कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून अंकुशरावजी इंगळे, अध्यक्ष जीवन विकास शिक्षण मंडळ तथा अध्यक्ष कृषी उत्पन्न बाजार समिती केज. तसेच प्रमुख पाहुणे म्हणून अनिल महाजन, अध्यक्ष ज्ञानदीप प्राथमिक विद्यालय तथा पत्रकार दैनिक लोकमत धारूर. इतर मान्यवर उपस्थितीमध्ये संस्थेचे सचिव जी. बी. गदळे, सहसचिव तथा स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कूलचे मु. अ. उपेंद्र कोकिळ, संचालक नारायण अंधारे, ज्ञानसागर अकॅडमीचे संचालक प्रा. सिद्धेश्वर वायबसे, सेवानिवृत्त शिक्षक हनुमंत घाडगे, बाबासाहेब शिनगारे, डॉ. हनुमंत सौदागर प्राचार्य भाऊसाहेब पाटील अध्यापक महा. केज. माजी सैनिक तथा साहित्यिक जनार्धन सोनवणे, प्रा. बाबासाहेब हिरवे बाबुराव आडसकर महा. केज, प्रा. विठ्ठल समुद्रे वसंत महा. केज, क्रांतीसुर्य न्यूजचे वार्ताहर तथा अध्यक्ष हास्य क्लब केज विनोदजी शिंदे, अशोकजी सोनवणे, शाळेच्या मुख्याध्यापिका शिवनंदा मुळे, प्रा. शाळेचे मु. अ. वसंत शितोळे, स्व. प्रमोद महाजन महा. प्राचार्य शंकर भैरट, स्वयंअर्थ शाळेचे मु. अ. अविनाश कराड आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीस उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले. मान्यवरांचे स्वागत प्रबोधकांत समुद्रे व शाळेतील विद्यार्थिनी यांनी ‘परंपरागत वंदनीय अभ्यागतम सुस्वागतम’ हे गीत गाऊन केले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक व पाहुण्यांचा परिचय जी. बी. गदळे यांनी दिला. याप्रसंगी ते म्हणाले, केज व परिसरामध्ये शैक्षणिक क्षेत्रामध्ये परिवर्तन घडवून आणण्याचे काम विश्वंभर कोकिळ व केशवराव नाळवंडीकर गुरुजी यांनी केले. विश्वंभर कोकिळ, यांनी शिक्षणक्षेत्रापासून वंचित राहणाऱ्या मुलांसाठी वस्तीगृहे उभी केली.

केज शहर व आसपासच्या परिसरात सर्वोत्कृष्ट शिक्षण विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी १९८४ साली जीवन विकास शिक्षण मंडळ केज या संस्थेची स्थापना केली. इ.स. २००० पासून उत्कृष्ट वक्त्यांचे विचार समाजात रुजविण्यासाठी व्याख्यानमालेची सुरुवात केली. गणेशोत्सव, आदर्श शिक्षक पुरस्कार, सांस्कृतिक क्षेत्रात देखील योगासन वर्ग, तसेच रक्तदान शिबीराचे आयोजन करून आरोग्याविषयीची जागरुकता दाखवली. त्यांच्या योगदानामुळे या शाळेतील विद्यार्थ्यांचा केवळ संख्यात्मक नव्हे तर गुणात्मकही विकास दिसून येतो.

दहावी बोर्ड परीक्षेत छत्रपती संभाजीनगर विभागातून २४ विद्यार्थ्यांपैकी या शाळेतील ४ विद्यार्थ्यांनी मिळविले १०० पैकी १०० टक्के. याचे श्रेय निश्चितच शाळेतील सर्व शिक्षकवृंदांना जाते.कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते अनिल महाजन याप्रसंगी बोलताना म्हणाले, विश्वंभर कोकिळ यांनी सर्वसामान्य ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी व होतकरू विद्यार्थ्यांसाठी शिक्षण संस्था उभी केली. अर्थात समाजाला खरं घडविण्याचे काम त्यांनी केले, आजच्या संगणक युगामध्ये केवळ पुस्तकी ज्ञान नव्हे तर या स्पर्धेच्या युगामध्ये टिकून राहण्यासाठी विद्यार्थ्यांनी सर्वांगीण प्रगती साधली पाहिजे, अशा स्पर्धेच्या माध्यमातून देशाचे नेतृत्व घडत असते. अध्यक्षीय समारोपात अंकुशराव इंगळे म्हणाले, विश्वंभर काका हे केवळ संस्थापकच नव्हे तर आधारस्तंभही होते, आजही विश्वंभर काकांच्या शिस्तीने चालणाऱ्या शाळेसाठी विना-अपेक्षेने कार्य करणारे शिक्षक व त्यांचा त्याग ही कारणे आहेत. अशा होऊन गेलेल्या महान व्यक्तीमत्त्वांच्या कार्याची जाणीव होण्यासाठी असे उपक्रम राबवले जातात. तसेच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी ही संस्था सदैव तत्पर असेल.

ही स्पर्धा ५ वी ते ७ वी तसेच ८ वी ते १० वी या दोन गटात पार पडली. या स्पर्धेमध्ये एकूण २७ शाळांनी सहभाग नोंदवला होता. याप्रसंगी लहान गटासाठी परीक्षक म्हणून सेवानिवृत्त शिक्षक हनुमंत घाडगे, बाबासाहेब शिनगारे, माजी सैनिक तथा साहित्यिक जनार्दन सोनवणे यांनी काम पाहिले. तर मोठ्या गटासाठी प्रा. डॉ. हनुमंत सौदागर प्राचार्य भाऊसाहेब पाटील अध्यापक महाविद्यालय केज, प्रा. बाबासाहेब हिरवे बाबुराव आडसकर महा. केज, प्रा. विठ्ठल समुद्रे वसंत महा. केज यांनी काम पाहिले.कार्यक्रमाच्या बक्षीस वितरण सत्रात शाळेतील सेवानिवृत्त शिक्षक हनुमंत घाडगे यांनी अध्यक्षपद भूषविले. तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी सैनिक तथा साहित्यिक जनार्दन सोनवणे हे उपस्थित होते. याप्रसंगी बोलताना हनुमंत घाडगे म्हणाले, विश्वंभर कोकिळ यांनी कधीही स्वतःचा व्यक्तिगत स्वार्थ न ठेवता सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रामध्ये अतिशय महत्त्वाचे योगदान दिले. पुढे त्यांनी स्पर्धेतील सहभागी विद्यार्थ्यांना वक्तृत्व स्पर्धेविषयी सखोल असे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे जनार्दन सोनवणे म्हणाले, विद्यार्थ्यांनी संस्कारक्षम शिक्षण घेतले पाहिजे. तसेच या स्पर्धेमध्ये टिकून राहायचे असेल तर विद्यार्थ्यांनी ज्ञानाच्या कक्षा विस्तारल्या पाहिजेत.

सदरील स्पर्धेसाठी उपस्थित परीक्षक म्हणून लाभलेले प्राचार्य हनुमंत सौदागर, प्रा. बाबासाहेब हिरवे, सहशिक्षक अमोल गुळवे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना स्पर्धेविषयी बहुमूल्य असे मार्गदर्शन केले. या परीक्षकांनी स्पर्धेच्या शिस्त, परिश्रम व आयोजनाचे कौतुक केले. तसेच केज सारख्या शाळेमध्ये दर्जेदार विद्यार्थी घडतातच कसे हे प्रत्यक्ष आज अनुभवले. स्पर्धेचा निकाल मेघशाम मंगरूळकर यांनी जाहीर केला.पहिला गट इयत्ता ५ वी ते ७ वी- वक्तृत्व स्पर्धेचा विषय ” कृत्रिम बुद्धिमत्ता- संधी व आव्हाने” या स्पर्धेमध्ये लहान गटातून आदर्श प्रा. वि. घाटनांदुर या शाळेची विद्यार्थीनी आवनी सूर्यकांत गिते हिने सर्वप्रथम येण्याचा बहुमान मिळविला. द्वितीय- आरोही अभिजीत वडगावकर स्वामी विवेकानंद विद्या मंदिर केज तृतीय- गौरी नवनाथ कांबळे अभिनव पाटील स्कूल, उत्तेजनार्थ- समृद्धी प्रदीप जाधवर खोलेश्वर मा. वि. अंबाजोगाई.

दुसरा गट इयत्ता ८ वी ते १० वी वक्तृत्व स्पर्धेचा विषय ” परीक्षा पेपरफुटी- विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ” या स्पर्धेमध्ये मोठ्या गटातून जनता मा. वि. धारूर या शाळेची विद्यार्थीनी अरोही बालासाहेब धोतरेहिने सर्वप्रथम येण्याचा बहुमान मिळविला. द्वितीय- अर्णव दत्तप्रसादजी सारडा श्री. लक्ष्मेश्वर वि. घाटनांदुर, तृतीय- नंदिनी सुरेश जगताप जयभवानी वि. लोखंडी सावरगाव, उत्तेजनार्थ- श्रावणी महेश साबळे श्रीम. गोदावरी कुंकूलोळ योगेश्वरी कन्या शाळा अंबाजोगाई इत्यादी. सर्व विजेत्या विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात आले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रबोधकांत समुद्रे यांनी केले. तर आभार शाळेच्या मुख्याध्यापिका शिवनंदा मुळे यांनी मानले.

digitalbeed
digitalbeedhttp://digitalbeed.in
DigitalBeed.in हे बीड जिल्हा तसेच महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी, स्थानिक बातम्या, सरकारी योजना, शेती, शिक्षण, नोकरी आणि तंत्रज्ञान विषयक माहिती देणारे मराठी डिजिटल न्यूज पोर्टल आहे. आमचे उद्दिष्ट वाचकांपर्यंत अचूक, विश्वासार्ह आणि जलद बातम्या पोहोचवणे आहे. बीड जिल्ह्यातील केज, माजलगाव, अंबाजोगाई, परळी, गेवराई, आष्टी आणि इतर भागातील स्थानिक घडामोडी आम्ही सातत्याने प्रसिद्ध करतो. ताज्या अपडेटसाठी DigitalBeed.in नियमित वाचा आणि आमच्या सोशल मीडियावर देखील जोडलेले राहा.
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

सर्व बातम्या

Recent Comments