केज प्रतिनिधी
प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी रोटरी क्लब ऑफ केज यांच्या वतीने गौरी सजावट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून या स्पर्धेचे परीक्षण शुक्रवार दि 18 सप्टेंबर व शनिवार दि 19 सप्टेंबर 2026 रोजी दुपारी 2 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंतच्या वेळेत केले जाईल. सजावटीसाठी यावर्षी सामाजिक ऐक्य, पर्यावरण, शिक्षण, आरोग्य, महिला सक्ष्मीकारण व पारंपारिक सजावट इत्यादी विषय राहणार आहेत.
या स्पर्धेत भाग घेऊ इच्छिणाऱ्या स्पर्धकांनी (परिवारांतील एका व्यक्तीने) आपले नांव, पूर्ण पत्ता, मोबाईल नंबर व परीक्षणासाठी अनुकूल दिवस आणि वेळ इत्यादी माहितीसह आपले प्रवेश गुरुवार दि 17सप्टेंबर 2026पूर्वी रोटरी क्लब ऑफ केज कडे पाठवणे बंधनकारक आहे. या स्पर्धेत केज शहरातील जास्तीत जास्त गौरी सजावट प्रेमीनी सहभागी व्हावे असे आवाहन रोटरी क्लब ऑफ केज चे अध्यक्ष असरार खुरेशी, सचिव हनुमंत भोसले व प्रोजेक्ट चेअरमन अरुण अंजान आणि मंगेश नेहरकर, दादा जमाले पाटील यांनी केले आहे.
प्रवेश व संपर्कासाठी हनुमंत भोसले (9423733888),
अरुण अंजान ( 94206 58811 ), मंगेश नेहरकर ( 97665 05856) व दादा जमाले पाटील (9823771333 ) यांचेशी संपर्क साधण्याचे आवाहन केज रोटरीच्या वतीने करण्यात आले आहे.

