Tuesday, November 24, 2026
HomeUncategorizedदुष्काळग्रस्तांना दिलासा! बीडमध्ये २२ नोव्हेंबरला भव्य हृदयरोग तपासणी शिबिर

दुष्काळग्रस्तांना दिलासा! बीडमध्ये २२ नोव्हेंबरला भव्य हृदयरोग तपासणी शिबिर

Spread the love

अँजिओप्लास्टी व बायपास सर्जरीसाठी पात्र रुग्णांना मोफत उपचाराची संधी; डॉ. अमित भराडिया करणार तपासणी

बीड (प्रतिनिधी)

दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आर्थिकदृष्ट्या गरजू रुग्णांना हृदयरोग तपासणी व उपचारांची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी जैन सोशल फेडरेशन, अहमदनगर संचलित आनंदऋषीजी हॉस्पिटल, बीड यांच्या वतीने रविवार, २२ नोव्हेंबर २०२६ रोजी भव्य हृदयरोग तपासणी व मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.या शिबिरात बीडचे भूमिपुत्र व हृदयरोगतज्ज्ञ डॉ. अमित भराडिया (DNB Cardiology) रुग्णांची तपासणी करून आवश्यक वैद्यकीय सल्ला व पुढील उपचारांबाबत मार्गदर्शन करणार आहेत.

हृदयरोगतज्ज्ञांची OPD तपासणी व सल्ला २०० रुपयांत उपलब्ध असून, OPD सोबत ECG मोफत करण्यात येणार आहे. तसेच 2D Echo ९०० रुपये आणि अँजिओग्राफी ३,००० रुपये या माफक दरात उपलब्ध करून देण्यात येणार आहे.विशेष म्हणजे, MJPJAY व PMJAY योजनेंतर्गत पात्र रुग्णांना योजनेच्या नियमांनुसार अँजिओप्लास्टी, बायपास सर्जरी आणि संबंधित उपचार मोफत मिळण्याची संधी उपलब्ध आहे. त्यामुळे आर्थिक अडचणींमुळे उपचार घेण्यास अडथळा येणाऱ्या गरजू रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे.याशिवाय डॉ. अमित भराडिया यांची हृदयरोग तपासणी व मार्गदर्शन सेवा दर महिन्याच्या दुसऱ्या व चौथ्या रविवारी आनंदऋषीजी हॉस्पिटलमध्ये उपलब्ध राहणार आहे.छातीत दुखणे, छातीत जडपणा, दम लागणे, जास्त घाम येणे, चक्कर येणे किंवा हृदयाची धडधड वाढणे अशी लक्षणे जाणवत असल्यास नागरिकांनी दुर्लक्ष न करता वेळेत तपासणी करून घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.शिबिराची माहितीतारीख : रविवार, २२ नोव्हेंबर २०२६वेळ : सकाळी १० ते सायंकाळी ६स्थळ : आनंदऋषीजी डायग्नोस्टिक सेंटर, जालना रोड, शाहू बँकेजवळ, बीडसंपर्क : ८२६२००९०९१सकल जैन समाज, बीड व आनंदऋषीजी हॉस्पिटल प्रशासनाच्या वतीने बीड शहरासह ग्रामीण भागातील नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

digitalbeed
digitalbeedhttp://digitalbeed.in
DigitalBeed.in हे बीड जिल्हा तसेच महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी, स्थानिक बातम्या, सरकारी योजना, शेती, शिक्षण, नोकरी आणि तंत्रज्ञान विषयक माहिती देणारे मराठी डिजिटल न्यूज पोर्टल आहे. आमचे उद्दिष्ट वाचकांपर्यंत अचूक, विश्वासार्ह आणि जलद बातम्या पोहोचवणे आहे. बीड जिल्ह्यातील केज, माजलगाव, अंबाजोगाई, परळी, गेवराई, आष्टी आणि इतर भागातील स्थानिक घडामोडी आम्ही सातत्याने प्रसिद्ध करतो. ताज्या अपडेटसाठी DigitalBeed.in नियमित वाचा आणि आमच्या सोशल मीडियावर देखील जोडलेले राहा.
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

सर्व बातम्या

Recent Comments