Monday, November 23, 2026
Homeबीड जिल्हाकेज महापारेषण केंद्रात ३३ के.व्ही. कॅपॅसिटरचा भीषण स्फोट; आगीने खळबळ

केज महापारेषण केंद्रात ३३ के.व्ही. कॅपॅसिटरचा भीषण स्फोट; आगीने खळबळ

Spread the love

आग विझविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू; नुकसानीचा अधिकृत आकडा अस्पष्ट, वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी महावितरणचे प्रयत्न

केज / प्रतिनिधी

केज शहरातील महापारेषण विभागाच्या वीज उपकेंद्रात ३३ के.व्ही. कॅपॅसिटर फुटल्याने अचानक आग लागल्याची घटना शनिवारी घडली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, आग विझविण्यासाठी अग्निशमन यंत्रणा तसेच संबंधित विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान, या दुर्घटनेत नेमके किती आर्थिक नुकसान झाले, याचा अधिकृत आकडा अद्याप समोर आलेला नाही.शनिवारी महापारेषण केंद्रातील ३३ के.व्ही. कॅपॅसिटर फुटल्याने आग लागली. घटनेची माहिती मिळताच संबंधित कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले.

आगीचे स्वरूप आणि झालेल्या नुकसानीचा नेमका अंदाज घेण्याचे काम सुरू असल्याने सध्या अधिकृत तपशील उपलब्ध झालेला नाही.यासंदर्भात केज येथील महापारेषण विभागाच्या कार्यालयाशी संपर्क साधला असता, कॅपॅसिटर फुटल्यामुळे आग लागल्याची माहिती देण्यात आली. आग विझविण्याचे काम सुरू असल्याने सध्या अधिक माहिती देता येणार नसल्याचे कार्यालयाकडून सांगण्यात आले.दरम्यान, या घटनेचा परिणाम केज शहरासह तालुक्यातील काही भागांतील वीजपुरवठ्यावर झाला आहे. वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी केज महावितरण कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी युद्धपातळीवर प्रयत्न करत आहेत.शहरातील तसेच तालुक्यातील ज्या भागांचा वीजपुरवठा खंडित झाला आहे, त्या भागात वीजपुरवठा पूर्ववत करण्याचे काम सुरू असल्याची माहिती केज शहर महावितरणचे अभियंता देविदास पवार यांनी भ्रमणध्वनीद्वारे दिली.महापारेषण केंद्रातील आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळाल्यानंतरच दुर्घटनेत झालेल्या नुकसानीचा नेमका आकडा स्पष्ट होणार आहे. तसेच वीजपुरवठा पूर्णपणे पूर्ववत होण्यासाठी आणखी किती वेळ लागेल, याबाबतची अधिकृत माहितीही त्यानंतरच स्पष्ट होण्याची शक्यता आहे.या घटनेनंतर महापारेषण व महावितरण प्रशासनाकडून कोणती कार्यवाही केली जाते आणि वीजपुरवठा पूर्णपणे कधी सुरळीत होतो, याकडे केज शहरासह तालुक्यातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

digitalbeed
digitalbeedhttp://digitalbeed.in
DigitalBeed.in हे बीड जिल्हा तसेच महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी, स्थानिक बातम्या, सरकारी योजना, शेती, शिक्षण, नोकरी आणि तंत्रज्ञान विषयक माहिती देणारे मराठी डिजिटल न्यूज पोर्टल आहे. आमचे उद्दिष्ट वाचकांपर्यंत अचूक, विश्वासार्ह आणि जलद बातम्या पोहोचवणे आहे. बीड जिल्ह्यातील केज, माजलगाव, अंबाजोगाई, परळी, गेवराई, आष्टी आणि इतर भागातील स्थानिक घडामोडी आम्ही सातत्याने प्रसिद्ध करतो. ताज्या अपडेटसाठी DigitalBeed.in नियमित वाचा आणि आमच्या सोशल मीडियावर देखील जोडलेले राहा.
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

सर्व बातम्या

Recent Comments