Friday, September 11, 2026
Homeराजकारणचिंचोलीमाळीत ग्रामपंचायत अधिकाऱ्याच्या शासकीय कामात अडथळा; एकाविरुद्ध NCR दाखल

चिंचोलीमाळीत ग्रामपंचायत अधिकाऱ्याच्या शासकीय कामात अडथळा; एकाविरुद्ध NCR दाखल

Spread the love

केज/प्रतिनिधी

ग्रामपंचायत कार्यालय चिंचोलीमाळी येथे ग्रामपंचायत अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या महिला अधिकाऱ्याच्या शासकीय कामात अडथळा आणून धमकी दिल्याप्रकरणी गुलाब बाबूखा पठाण रा.चिंचोलीमाळी,ता. केज यांच्याविरुद्ध केज पोलीस ठाण्यात असंज्ञेय (NCR) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार,दि.४ सप्टेंबर २०२६ रोजी केज पोलीस ठाण्यात अंबाजोगाई येथील रहिवासी व चिंचोली माळी ग्रामपंचायतीच्या अधिकारी अनिता सखाराम जाधव यांनी तक्रार नोंदवली आहे. दि.१९ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी त्या ग्रामपंचायत कार्यालयात दैनंदिन कामकाज करत असताना,आरोपी गुलाब पठाण याने सभागृहाच्या ताबा पावतीची मागणी केली.

यावर सरपंचांची सही व वरिष्ठ अधिकाऱ्यांची मंजुरी असल्याशिवाय ताबा पावती देता येत नाही, असे सांगितले असता आरोपीने हुज्जतघालून कामात अडथळा निर्माण केला व धमकी दिली.

याप्रकरणी अनिता जाधव यांच्या तक्रारीवरून केज पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (B.N.S.S.)च्या कलम २२४ अन्वये अदखल पात्र गुन्हा (NCR No. ०८८०/२०२६) नोंदवण्यात आला आहे.या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक राहुल कामाजी सूर्यतळ यांच्या मार्गदर्शना खाली सुरू आहे.

digitalbeed
digitalbeedhttp://digitalbeed.in
DigitalBeed.in हे बीड जिल्हा तसेच महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी, स्थानिक बातम्या, सरकारी योजना, शेती, शिक्षण, नोकरी आणि तंत्रज्ञान विषयक माहिती देणारे मराठी डिजिटल न्यूज पोर्टल आहे. आमचे उद्दिष्ट वाचकांपर्यंत अचूक, विश्वासार्ह आणि जलद बातम्या पोहोचवणे आहे. बीड जिल्ह्यातील केज, माजलगाव, अंबाजोगाई, परळी, गेवराई, आष्टी आणि इतर भागातील स्थानिक घडामोडी आम्ही सातत्याने प्रसिद्ध करतो. ताज्या अपडेटसाठी DigitalBeed.in नियमित वाचा आणि आमच्या सोशल मीडियावर देखील जोडलेले राहा.
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

सर्व बातम्या

Recent Comments