Friday, October 9, 2026
Homeविशेष लेख9-10 दिवस झाले तरी महावितरणचा निष्काळजीपणा कायम!विडा महावितरण कार्यालय झोपेत? गप्पेवाडीतील नागरिक...

9-10 दिवस झाले तरी महावितरणचा निष्काळजीपणा कायम!विडा महावितरण कार्यालय झोपेत? गप्पेवाडीतील नागरिक त्रस्त!

Spread the love

डिजिटल बीड प्रतिनिधी /केज

गप्पेवाडीतील मृत्यूचा साप बनलेले वीजतार; महावितरणचा बेजबाबदारपणा टोकाला!


केज तालुक्यातील गप्पेवाडी गावात बाराभाई वस्ती ते महादेव वस्ती दरम्यान 3-फेज वीजतार अक्षरशः जमिनीवर पडायच्यां अवस्थेत आहेत, आणि वेळोवेळी तक्रार देऊनही महावितरण मात्र गाढ झोपेत आहे! गेल्या अनेक दिवसांपासून ही जीवघेणी परिस्थिती कायम असूनही संबंधित अधिकाऱ्यांनी एकदाही फिरकून पाहिले नाही, ही बाब संतापजनक आहे.


रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांच्या डोक्यावर मृत्यूचं सावट निर्माण झालं आहे. लहान मुलं, शाळकरी विद्यार्थी, शेतकरी आणि जनावरं रोज या धोकादायक वीजतारांच्या छायेतून जीव मुठीत धरून प्रवास करत आहेत. एवढंच नव्हे तर लगतचं मंदिर असल्यामुळे महिलांची आणि वयोवृद्धांचीही मोठ्या प्रमाणात वर्दळ असते — पण प्रशासनाला याचं काहीच देणंघेणं नाही!


पावसाळा तोंडावर आला आहे, आणि ओलसर जमिनीमुळे विजेचा प्रवाह कधीही पसरू शकतो. एका क्षणात मोठी दुर्घटना घडू शकते — पण महावितरणला बहुतेक मृत्यूचाच आकडा पाहायचा आहे का?
ग्रामस्थांनी वारंवार विडा( केज) येथील महावितरण कार्यालयात तक्रारी करूनही अधिकारी ढिम्म हलत नाहीत.

“एखाद्याचा जीव गेला कीच तुम्ही जागे होणार का?” असा संतप्त सवाल आता गावकरी थेट प्रशासनाला विचारत आहेत.
जर तात्काळ कारवाई झाली नाही, तर ग्रामस्थ रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडण्याच्या तयारीत आहेत — आणि त्या वेळी उद्भवणाऱ्या परिस्थितीची पूर्ण जबाबदारी महावितरण प्रशासनावरच असेल!

digitalbeed
digitalbeedhttp://digitalbeed.in
DigitalBeed.in हे बीड जिल्हा तसेच महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी, स्थानिक बातम्या, सरकारी योजना, शेती, शिक्षण, नोकरी आणि तंत्रज्ञान विषयक माहिती देणारे मराठी डिजिटल न्यूज पोर्टल आहे. आमचे उद्दिष्ट वाचकांपर्यंत अचूक, विश्वासार्ह आणि जलद बातम्या पोहोचवणे आहे. बीड जिल्ह्यातील केज, माजलगाव, अंबाजोगाई, परळी, गेवराई, आष्टी आणि इतर भागातील स्थानिक घडामोडी आम्ही सातत्याने प्रसिद्ध करतो. ताज्या अपडेटसाठी DigitalBeed.in नियमित वाचा आणि आमच्या सोशल मीडियावर देखील जोडलेले राहा.
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

सर्व बातम्या

Recent Comments