Wednesday, November 25, 2026
HomeUncategorizedटोरंटो कंपनीच्या मजुराची वाघेबाभुळगाव शिवारात आत्महत्या; उत्तर प्रदेशातील मजुराने गळफास घेत जीवन...

टोरंटो कंपनीच्या मजुराची वाघेबाभुळगाव शिवारात आत्महत्या; उत्तर प्रदेशातील मजुराने गळफास घेत जीवन संपवले

Spread the love

केज,

वार्ताहर तालुक्यातील नांदूरघाट परिसरात पवन ऊर्जा निर्मिती करणाऱ्या टोरंटो कंपनीत काम करणाऱ्या एका परप्रांतीय मजुराने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे नांदूरघाट परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

सोमवारी ( दि. 23 ) केज तालुक्यातील नांदूरघाट ते नांदुराफाटा रस्त्यावर आसलेल्या वाघेबाभुळगाव शिवारात ही घटना घडली आसून परप्रांतीय मृत मजुराचे नाव फैजान मोहम्मद, वय 23 वर्षे, रा. उत्तर प्रदेश असे आहे. तो टोरँटो या पवनचक्की कंपनीत मजूर म्हणून काम करीत होता. फैजान मोहम्मद याने वाघेबाभुळगाव शिवारातील लिंबाच्या झाडाला सोमवारी ( दि. 23 ) गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे सकाळच्या वेळी घटना परिसरातील नागरिकांच्या निदर्शनास आली. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक राहुल सूर्यतळ यांच्या मार्गदर्शनाखाली नांदूरघाट पोलीस दूरक्षेत्राचे जमादार राजू वंजारे यांनी तातडीने घटनास्थळी जाऊन पाहणी करून या घटनेचा पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी नांदूरघाट येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.

फैजान याच्या आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नसून,याबाबत पोलिस तपास करीत आहेत . परप्रांतातून रोजगारासाठी आलेला तरुण मजूर आणि त्याने उचललेले हे टोकाचे पाऊल यामुळे त्याच्या सहकाऱ्यांमध्येही हळहळ व्यक्त होत आहे. या प्रकरणी केज पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पोलीस निरीक्षक राहुल सूर्यतळ यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार राजू वंजारे हे पुढील तपास करीत आहेत.

उत्तरप्रदेशातील मृताच्या नातेवाईकांना ही माहिती कळविण्यात आली असून, त्यांच्या कुटुंबियांच्या जबाबानंतरच आत्महत्येचे खरे कारण समोर येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.

digitalbeed
digitalbeedhttp://digitalbeed.in
DigitalBeed.in हे बीड जिल्हा तसेच महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी, स्थानिक बातम्या, सरकारी योजना, शेती, शिक्षण, नोकरी आणि तंत्रज्ञान विषयक माहिती देणारे मराठी डिजिटल न्यूज पोर्टल आहे. आमचे उद्दिष्ट वाचकांपर्यंत अचूक, विश्वासार्ह आणि जलद बातम्या पोहोचवणे आहे. बीड जिल्ह्यातील केज, माजलगाव, अंबाजोगाई, परळी, गेवराई, आष्टी आणि इतर भागातील स्थानिक घडामोडी आम्ही सातत्याने प्रसिद्ध करतो. ताज्या अपडेटसाठी DigitalBeed.in नियमित वाचा आणि आमच्या सोशल मीडियावर देखील जोडलेले राहा.
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

सर्व बातम्या

Recent Comments