Friday, October 9, 2026
Homeराजकारणगप्पेवाडी-नामेवाडी ग्रामपंचायतीत भ्रष्टाचाराचा संशय; ग्रामस्थांची चौकशीसाठी धाव!"

गप्पेवाडी-नामेवाडी ग्रामपंचायतीत भ्रष्टाचाराचा संशय; ग्रामस्थांची चौकशीसाठी धाव!”

Spread the love

गप्पेवाडी/नामेवाडी ग्रुप ग्रामपंचायतीतील कथित गैरव्यवहारांची चौकशी करण्याची गोकुळ केदार व ग्रामस्थांची मागणी

केज, प्रतिनिधी :

गप्पेवाडी/नामेवाडी ग्रुप ग्रामपंचायतीतील विविध विकासकामे, शासकीय योजना व आर्थिक व्यवहारांमध्ये कथित अनियमितता झाल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात आला असून या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.

ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, प्रधानमंत्री आवास योजना, विविध विकासकामे तसेच ग्रामपंचायतीच्या निधीच्या वापराबाबत अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. काही कामे प्रत्यक्षात पूर्ण न होता निधी खर्च दाखविण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. तसेच मस्टर रोल, मोजमाप पुस्तिका (एम.बी.), आवक-जावक नोंदी व इतर अभिलेखांमध्ये तफावत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

याबाबत ग्रामस्थांनी पंचायत समिती व संबंधित प्रशासनाकडे लेखी तक्रार सादर करून मागील वर्षांतील सर्व विकासकामे, निधी खर्च व शासकीय योजनांची चौकशी करण्याची मागणी केली आहे.

तसेच दोषी आढळणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणीही करण्यात आली आहे.दरम्यान, या आरोपांबाबत ग्रामपंचायत प्रशासनाची अधिकृत भूमिका अद्याप समोर आलेली नाही.

संबंधित विभागाकडून चौकशी झाल्यानंतरच वस्तुस्थिती स्पष्ट होणार असल्याचे सांगितले जात आहे.

digitalbeed
digitalbeedhttp://digitalbeed.in
DigitalBeed.in हे बीड जिल्हा तसेच महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी, स्थानिक बातम्या, सरकारी योजना, शेती, शिक्षण, नोकरी आणि तंत्रज्ञान विषयक माहिती देणारे मराठी डिजिटल न्यूज पोर्टल आहे. आमचे उद्दिष्ट वाचकांपर्यंत अचूक, विश्वासार्ह आणि जलद बातम्या पोहोचवणे आहे. बीड जिल्ह्यातील केज, माजलगाव, अंबाजोगाई, परळी, गेवराई, आष्टी आणि इतर भागातील स्थानिक घडामोडी आम्ही सातत्याने प्रसिद्ध करतो. ताज्या अपडेटसाठी DigitalBeed.in नियमित वाचा आणि आमच्या सोशल मीडियावर देखील जोडलेले राहा.
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

सर्व बातम्या

Recent Comments