वितरितनांदूर घाट, ता. केज | प्रतिनिधीदिवाळीच्या सणानिमित्त नांदूर घाट ग्रामपंचायतीच्या वतीने गावातील दिव्यांग बांधवांना दिलासा देणारा उपक्रम राबविण्यात आला. दिव्यांगांसाठी राखीव असलेल्या ५ टक्के निधीचे आज वितरण करण्यात आले. या माध्यमातून गावातील तब्बल ८० दिव्यांग लाभार्थ्यांना प्रत्येकी एक हजार रुपयांचा धनादेश देण्यात आला. त्यामुळे दिव्यांग बांधवांची दिवाळी खऱ्या अर्थाने गोड झाली असून ग्रामपंचायतीच्या या उपक्रमाचे सर्वत्र स्वागत होत आहे.शासनाच्या नियमानुसार दिव्यांग व्यक्तींसाठी राखीव असलेल्या निधीचा लाभ प्रत्यक्ष लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याच्या दृष्टीने नांदूर घाट ग्रामपंचायतीने हा उपक्रम राबविला. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर आर्थिक मदतीचे धनादेश मिळाल्याने दिव्यांग बांधवांच्या चेहऱ्यावर समाधान आणि आनंद पाहायला मिळाला.या वेळी नांदूर घाट ग्रामपंचायतीचे सरपंच युवराज बापू पाटील, ग्रामसेवक केदार साहेब, प्रहार संघटनेचे बीड जिल्हाध्यक्ष रघुनाथ तोंडे तसेच प्रहार संघटनेचे सर्व पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते लाभार्थ्यांना धनादेशांचे वितरण करण्यात आले.दिव्यांग बांधव हे समाजाचा महत्त्वाचा घटक असून त्यांच्या हक्काचा निधी वेळेवर आणि पारदर्शकपणे त्यांच्यापर्यंत पोहोचणे आवश्यक आहे
नांदूर घाट ग्रामपंचायतीने दिव्यांग बांधवांची दिवाळी केली गोड!दिव्यांगांच्या हक्काच्या ५ टक्के निधीचे वाटप; ८० दिव्यांग लाभार्थ्यांना प्रत्येकी एक हजार रुपयांचे धनादेश वितरित
RELATED ARTICLES

