केज येथील बस आगाराला मंजुरी द्यावी केज विकास संघर्ष समितीची परिवहन मंत्र्याकडे मागणी
केज/प्रतिनिधीकेज हे बीड जिल्याचे सर्वात जुने तालुक्याचे ठिकाण असून,सध्या हे शहर खामगांव – पंढरपुर व अहमदपुर अहिल्यानगर या दोन राष्ट्रीय महामार्गाच्या जोडणीवर आहे. त्यामुळे येथुन दररोज हजारो प्रवाशी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात ये-जा करीत आहेत.त्यामूळे प्रवाशांच्या सोईसाठी केज येथील बस आगाराला मंजुरी देण्याची मागणी केज विकास संघर्ष समितीच्या वतीने परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
केज शहरात बस आगारासाठी सध्या केज-बीड महामार्गा लगत साडे सात एकर हुन अधिक जागा आरक्षित केलेली आहे. ही जागा सध्या पडुन असल्याने स्थानिक लोकांच्या अतिक्रमणाने व्यापली जाऊ लागली आहे.या ठिकाणी तात्काळ बस आगार स्थापन करुन ते कार्यान्वीत करावे अशी मागणी समिती गेले अनेक वर्षापासुन करीत असुन सध्या या जागेवर बस आगार सेंटर सुरु करता येवु शकते.
सध्याचे धारुर बस आगार केज साठी सोयीचे नाही त्यामुळे केज येथुन सुटणाऱ्या गाड्यांना केज धारूर हा पंधरा किलोमीटर चा प्रवास प्रवाशी संख्येविना आर्थिक दृष्या परवडणारा नाही.तरी केज येथील बस आगार मंजूर करण्यात यावे.अशी मागणी केज संघर्ष समितीच्या वतीने करण्यात आली आहे.या निवेदनावर प्रा. हनुमंत भोसले,रामहरी कोल्हे,नासेर मुंडे,व शेषराव घोरपडे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.चौकटबस चार्जिंग सेंटर मंजूर असूनही सुरु होईना
एक वर्षांपूर्वी केज विधानसभा सभेच्या आ.नमिता मुंदडा व केज विकास संघर्ष समितीच्या वतीने शासन दरबारी प्रयत्न करण्यात अल्यामुळे राज्य शासनाने एक वर्षांपूर्वी केज येथे बस चार्जिंग सेंटरला मंजुरी दिलेली आहे.परंतु एक वर्षे झाले तरीही ते अद्याप सुरु झालेले नाही.
ते लवकरात लवकर सुरु करण्यात यावे अशी मागणीही परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे करण्यात आली आहे अशी माहिती हनुमंत भोसले यांनी प्रतिनिधीशी बोलताना दिली.हेडलाईन्स

