केज / प्रतिनिधी : – केज विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) गटाचे अंबाजोगाई तालुकाध्यक्ष अमर देशमुख यांची सिकंदराबाद विभागीय रेल्वे प्रवासी समितीवर सदस्यपदी निवड झाली आहे.
त्यांच्या या निवडीमुळे अंबाजोगाई तालुक्यातील राजकीय वर्तुळातून त्यांचे अभिनंदन होत आहे.खासदार बजरंग बप्पा सोनवणे यांनी सामान्य कार्यकर्त्यावर विश्वास दाखवत सिकंदराबाद विभागीय रेल्वे प्रवासी समितीवर सदस्य म्हणून काम करण्याची संधी दिल्याबद्दल अमर देशमुख यांनी त्यांची भेट घेऊन सत्कार केला व मनःपूर्वक आभार व्यक्त केले.यावेळी माजी आमदार पृथ्वीराज साठे साहेब यांच्यासह मित्रपरिवार उपस्थित होता.
रेल्वे प्रवाशांच्या समस्या, प्रवासी सुविधा, रेल्वे सेवा आणि प्रवाशांच्या हिताच्या प्रश्नांवर समितीच्या माध्यमातून काम करण्याची संधी मिळाल्याने आपण या जबाबदारीला न्याय देण्याचा प्रयत्न करू, अशी भावना अमर देशमुख यांनी व्यक्त केली.

