केज/प्रतिनिधी
केज येथील शुक्रवार पेठ भागातील प्रसिद्ध श्री बालाजी मंदिर देवस्थान येथे रविवार दि.११ ऑक्टोबर २०२६ ते शुक्रवार दि. २३ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत श्री शारदीय नवरात्र महोत्सव उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. या महोत्सवा निमित्त मंदिरात विविध धार्मिक विधी,हरिपाठ, महाआरती,नामांकित कीर्तनकारांची कीर्तन सेवा आणि पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.महोत्सवा दरम्यान दररोज सायंकाळी ५-०० वाजता श्री विष्णुसहस्त्रनाम स्तोत्र पठण,सायंकाळी ६-०० वाजता हरिपाठ आणि रात्री ८-०० वाजता महाआरती संपन्न होणार आहे.
तसेच दररोज रात्री ९-०० ते ११-०० या वेळेत राज्यभरातील नामांकित कीर्तनकारांची कीर्तन सेवा होणार आहे.कीर्तन महोत्सवाची रूपरेषा पुढील प्रमाणे आहे.दि.११ व १२ ऑक्टोबर रोजी ह.भ.प.लक्ष्मीकांत महाराज सेवलीकर छत्रपती संभाजीनगर यांची नारदीय कीर्तन सेवा होणार आहे.दि.१३ ऑक्टोबर रोजी ह.भ.प.शामसुंदर महाराज पांचाळ लाडेवडगाव यांची वारकरी कीर्तन सेवा होणार आहे.दि.१४ ऑक्टोबर रोजी रामायणाचार्य ह.भ.प. गणेश महाराज बांगर आळंदी देवाची यांची कीर्तन सेवा होणार आहे.दि.१५ व १६ ऑक्टोबर रोजी ह.भ.प.योगीराज महाराज गोंदीकर श्री गुरुदत्त धाम,गोंदी यांची नारदीय कीर्तन सेवा होणार आहे.दि. १७ ऑक्टोबर रोजी बालकीर्तनकार ह.भ.प.आकाश महाराज सुरवसे डोणगाव फाटा यांची कीर्तन सेवा संपन्न होणार आहे.दि.१८ व १९ ऑक्टोबर रोजी ह.भ.प.कु.दिपालीताई रघुनाथ कुलकर्णी परतूर यांची नारदीय कीर्तन सेवा संपन्न होणार आहे.
दि.२० ऑक्टोबर रोजी विजयादशमी (दसरा) या दिवशी वारकरी रत्न ह.भ.प.प्रमोद महाराज पवार चंदनसावरगाव यांचे विशेष विजयादशमी निमित्ताने कीर्तन रात्री १० ते १२ या वेळेत संपन्न होणार आहे.दि.२१ ऑक्टोबर रोजी भारुड सम्राट ह.भ.प. सतीश महाराज पांचाळ लातूर यांचा विनोदी भारुडाचा कार्यक्रम संपन्न होणार आहे.दि.२२ ऑक्टोबर रोजी ह.भ.प.जालिंदर दादा नेहरकर अध्यक्ष, निष्काम कीर्तन सेवा मंडळ,केज बीड यांची कीर्तन सेवा होणार आहे.भव्य पालखी मिरवणूक व सांगता हीउत्सवाच्या सांगतादिनी म्हणजेच शुक्रवार दि. २३ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी ४-०० वाजता श्री बालाजी महाराजांची भव्य पालखी मिरवणूक निघणार आहे.
त्या नंतर उत्तर रात्री तीर्थप्रसाद वाटपाने या महोत्सवाची सांगता होईल.या संपूर्ण सोहळ्यात भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून दर्शनाचा व कीर्तन श्रवणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री बालाजी मंदिर देवस्थानचे विश्वस्त मंडळ,पुजारी मंडळ आणि सहकारी भक्त गणांच्या वतीने करण्यात आले आहे.Headlines

