अंबाजोगाई प्रतिनिधी
धिवार राजकुमार बीड जिल्ह्यातील शेतकरी, शेतमजूर, महिला, निराधार, भूमिहीन तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी *दि. ८ सप्टेंबर २०२६ रोजी अंबाजोगाई उपजिल्हाधिकारी कार्यालयावर ‘शेतकरी जनआक्रोश’ मोर्चा काढण्यात येणार आहे.* या मोर्चाच्या माध्यमातून शासनाने नागरिकांच्या मागण्यांवर तात्काळ सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.यावर्षी अंबाजोगाई तालुक्यासह बीड जिल्ह्यात पावसाचे अत्यल्प प्रमाण असल्याने शेतकरी, शेतमजूर, पशुपालक आणि सर्वसामान्य नागरिक आर्थिक व सामाजिक संकटात सापडले आहेत. खरीप हंगामातील पिके धोक्यात आली असून पिण्याच्या पाण्याचा तसेच जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्नही गंभीर बनला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील परिस्थितीचा गांभीर्याने विचार करून तातडीने उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली आहे.*
प्रमुख मागण्यांमध्ये बीड जिल्ह्यात सरसकट दुष्काळ जाहीर करावा, शेतकऱ्यांचा सरसकट पीक विमा मंजूर करून त्याची रक्कम तात्काळ वितरित करावी, तसेच सन २०२४-२५ च्या खरीप पीक विम्याची थकीत रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर तात्काळ जमा करावी* यांचा समावेश आहे.दुष्काळी परिस्थितीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना *हेक्टरी एक लाख रुपये अनुदान* जाहीर करून ते तातडीने वितरित करावे, अशीही मागणी करण्यात आली आहे. तसेच डिघोळ आंबा हे गाव पाटोदा सज्जामधून वगळून लोखंडी सावरगाव सज्जामध्ये समाविष्ट करावे अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.लाडकी बहीण’ योजनेतून वगळण्यात आलेल्या पात्र महिलांचा योजनेत समावेश करून त्यांचे आतापर्यंतचे थकीत हप्ते तात्काळ जमा करावेत अशी मागणीही करण्यात आली आहे
.दरम्यान, दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन तालुक्यातील गावागावांमध्ये टँकरद्वारे तसेच इतर आवश्यक माध्यमातून पिण्याच्या पाण्याची तात्काळ व्यवस्था करावी अशी मागणी करण्यात आली आहे.या विविध मागण्यांकडे शासन व प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन सकारात्मक निर्णय घ्यावा, अन्यथा शेतकरी व नागरिकांचा रोष अधिक तीव्र होईल, असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे. त्यामुळे ८ सप्टेंबर रोजी होणाऱ्या शेतकरी जनआक्रोश मोर्चाकडे प्रशासनाचे लक्ष लागले आहे. अक्षय भुंबे बादल तरकसे मीनाताई लोढे आरूण बनसोडे शेरू पठाण निवेदनावर आदीनी स्वाक्षस्या केल्या आहेत

