आष्टी / कार्यकारी संपादक संदीप सोनवणे
बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील धामणगाव येथे एक धक्कादायक अपघात घडला. धामणगाव-पाथर्डी रस्त्यावरील लोखंडे-चौधरी वस्ती परिसरात उसाने भरलेला भरधाव ट्रक थेट दिंगांबर दत्तात्रय औटी यांच्या घरात घुसला.या भीषण धडकेत घराची भिंत, किचन तसेच संसारोपयोगी साहित्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
ट्रकची धडक इतकी जोरदार होती की घराच्या बांधकामाचेही मोठे नुकसान झाले.मात्र, सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली.
अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.घराचे मोठे नुकसान झाल्याने औटी कुटुंबाचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून, झालेल्या नुकसानीची भरपाई मिळावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

