!बीड-परळी रस्त्यावरील मैंद्याजवळ सुरू असलेल्या अर्धवट रस्ताकामामुळे एक ट्रॅक्टर ट्रॉलीसह धोकादायक स्थितीत अडकल्याची घटना समोर आली आहे. रस्त्यावर कोणतेही योग्य दिशादर्शक फलक किंवा बॅरिकेट्स नसल्यामुळे चालकाला रस्ता पुढे अपूर्ण असल्याची कल्पना आली नाही. परिणामी, ट्रॅक्टर थेट अर्धवट असलेल्या लेनवर गेला आणि ट्रॉली कलंडलेल्या अवस्थेत एका बाजूला लटकली.उतरायला जागा नसल्यामुळे चालक आणि ऊस उत्पादक शेतकरी दोघेही जीव मुठीत धरून उभे होते. प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे घडलेल्या या प्रकारामुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.भरलेल्या ट्रॉलीसह रस्त्यावर चढवले पण आता उतरवायचे कसे?
असा प्रश्न चालक आणि ऊसाच्या शेतकऱ्याला पडला आहे.. ट्रॉली कललेल्या अवस्थेत असल्याने ट्रॅक्टर मालक आणि शेतकरी दोन्ही जीव मुठीत धरून उभा होते.. बीड परळीच्या काम सुरू असलेल्या रस्त्यावर दिशादर्शक फलक नसल्याने रस्ताकाम अर्धवट असलेल्या लेन वर ट्रॅक्टर ट्रॉली सह नेले मात्र आता उतरायला जागाच नसल्याने अडकले आहे.. मैंद्याजवळ हे दृश्य आता थोड्या वेळापूर्वी होते.. चालकाला रस्ताच पुढे अर्धवट आहे हे जर योग्य दिशादर्शक बसविले असते आणि समोर बॅरिकेट असते तर कळले असते मात्र तसं काही नसल्याने ट्रॅक्टर ट्रॉली सह अडकला आहे….

