चिंचोली माळी येथे अखंड हरिनाम सप्ताह; ह.भ.प. विवेक महाराज दळवे यांची देवभक्त चरित्र भावकथा

Spread the love

केज/प्रतिनिधी

चिंचोली माळी येथील ग्रामदैवत वै. संतश्रेष्ठ नामदेव महाराज यांच्या प्रेरणेने आणि ह.भ.प. वै. रामभाऊ अण्णा दळवे यांनी सुरू केलेल्या मातंग वस्तीतील विठ्ठल-जनाई मंदिरात १३६ वा अखंड हरिनाम सप्ताह व देवभक्त चरित्र भावकथा-कीर्तन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

ह.भ.प. श्री. सुनील महाराज गालफाडे यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा होत असून, ह.भ.प. विवेक महाराज दळवे यांच्या रसाळ वाणीतून भाविकांना देवभक्त चरित्र भावकथेचा लाभ मिळणार आहे.या सप्ताहाची सुरुवात कलश पूजनाने होणार असून ह.भ.प. श्री. पुरुषोत्तम महाराज गिरी (उत्तरेश्वर पिंपरी), ह.भ.प. डॉ. श्री. चत्रभुज महाराज वायबसे आणि ह.भ.प. श्री. विष्णू महाराज शास्त्री चिंचोलीकर यांच्या हस्ते कलश पूजन होणार आहे.

सप्ताहादरम्यान सोमवार, दि. १७ ऑगस्ट रोजी ह.भ.प. श्री. संभाजी महाराज चिंचोलीकर, दि. १८ रोजी ह.भ.प. श्री. हरी पंडित महाराज साळेगाव, दि. १९ रोजी ह.भ.प. श्री. महारुद्र महाराज खाडे (शिवगड संस्थान), दि. २० रोजी ह.भ.प. श्री. हरी पंडित महाराज व ह.भ.प. श्री. व्यंकट महाराज केंद्रे (हाडोळी, नांदेड), दि. २१ रोजी ह.भ.प. कु. भागवताचार्य अंकिताताई महाराज घुले (वृंदावन धाम), दि. २२ रोजी ह.भ.प. रामायणाचार्य श्री. नाना महाराज कदम (नेकनूर), दि. २३ रोजी ह.भ.प. भागवतभूषण श्री. केशव महाराज टाकळीकर आणि दि. २४ ऑगस्ट रोजी ह.भ.प. भागवताचार्य सौ. शारदाताई महाराज गालफाडे चिंचोलीकर यांचे हरिकीर्तन होणार आहे.

दररोज सकाळी ४ ते ६ काकड आरती, सकाळी ६ ते ७ विष्णुसहस्रनाम, सकाळी ९ ते ११ गाथा भजन, दुपारी २ ते ५ भावचरित्र कथा, सायंकाळी ५ ते ६ हरिपाठ, रात्री ८ ते १० हरिकीर्तन, त्यानंतर भजन व जागर असे विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत.मंगळवार, दि. २५ ऑगस्ट रोजी ह.भ.प. महंत श्री. भगवान महाराज शास्त्री वरपगावकर यांच्या काल्याच्या कीर्तनाने सप्ताहाची सांगता होणार आहे.या अखंड हरिनाम सप्ताहात पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून भावचरित्र कथा, हरिकीर्तन व विविध धार्मिक कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन मार्गदर्शक ह.भ.प. श्री. सुनील महाराज गालफाडे तसेच ग्रामस्थ व भजनी मंडळ, चिंचोली माळी यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *