पुणे | प्रतिनिधी
महिलांना राजकीय, सामाजिक आणि सार्वजनिक क्षेत्रात सक्षम नेतृत्व करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने अजिंक्य डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या स्कूल ऑफ गव्हर्नन्स अँड पब्लिक पॉलिसी यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या महिला नेतृत्व विकासाच्या ‘लोकनेत्री’ कार्यक्रमाचे उद्घाटन आज पुणे येथे उत्साहात पार पडले.या कार्यक्रमात ‘धोरणापासून प्रत्यक्ष परिणामापर्यंत’ (From Policy to Impact) या विषयावर मार्गदर्शन करताना महिलांनी राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात नेतृत्व करताना संयम, साहस, सातत्य आणि स्वतःच्या मूल्यांशी प्रामाणिक राहण्याची वृत्ती जोपासणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन करण्यात आले. केवळ धोरणे तयार करणे महत्त्वाचे नसून ती प्रत्यक्षात उतरवून समाजामध्ये सकारात्मक बदल घडवून आणणे हे खऱ्या नेतृत्वाचे उद्दिष्ट असले पाहिजे, असा संदेश यावेळी देण्यात आला.
या उपक्रमाच्या पहिल्या तुकडीत देशभरातील ४० महिला नेत्यांचा सहभाग होता. यामध्ये ग्रामपंचायतीपासून महानगरपालिकेपर्यंतच्या लोकप्रतिनिधी, राजकीय क्षेत्रात निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या महिला, तसेच बचत गट, महासंघ आणि स्वयंसेवी संस्थांमध्ये नेतृत्व करणाऱ्या महिलांचा समावेश आहे.या उद्घाटनप्रसंगी अजिंक्य डी. वाय. पाटील ग्रुपच्या चेअरपर्सन पूजा पाटील, उपाध्यक्ष ईश पाटील, विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. राकेश कुमार जैन, प्रोग्राम डायरेक्टर स्नेहा मेहता आणि श्वेता शालिनी फाउंडेशनच्या संस्थापक श्वेता शालिनी यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.महिलांच्या नेतृत्वगुणांना चालना देणारा, त्यांना धोरणनिर्मितीपासून प्रत्यक्ष सामाजिक परिवर्तनापर्यंतचा प्रवास घडविण्यास मदत करणारा ‘लोकनेत्री’ हा उपक्रम निश्चितच महत्त्वपूर्ण ठरणार आहे. या नाविन्यपूर्ण उपक्रमाच्या यशस्वी वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा व्यक्त करण्यात आल्या.



