Monday, November 23, 2026
Homeराजकारणकृष्णा परबळे, आदित्य ठोके व प्रथमेश खोमणे यांच्या पुढाकाराने नांदूर घाटमध्ये गरजूंची...

कृष्णा परबळे, आदित्य ठोके व प्रथमेश खोमणे यांच्या पुढाकाराने नांदूर घाटमध्ये गरजूंची दिवाळी गोड!

Spread the love

शिवसेनेच्या माध्यमातून दिव्यांग, वयोवृद्ध व निराधारांच्या घरी पोहोचला दिवाळीचा शिधा; युवकांनी घरोघरी जाऊन केले किराणा किटचे वाटप

नांदूर घाट, ता. केज, जि. बीड | प्रतिनिधी

दिवाळीच्या झगमगाटात समाजातील शेवटच्या घटकाच्या घरातही आनंदाचा दिवा पेटावा, या सामाजिक भावनेतून नांदूर घाट येथे शिवसेनेच्या वतीने अनोखा उपक्रम राबविण्यात आला. शिवसेना केज तालुका सोशल मीडिया प्रमुख कृष्णा परबळे, शिवसेना बीड जिल्हा सोशल मीडिया प्रमुख आदित्य ठोके आणि प्रथमेश खोमणे यांच्या पुढाकारातून गावातील दिव्यांग, वयोवृद्ध आणि आर्थिकदृष्ट्या गरजू कुटुंबांना घरोघरी जाऊन दिवाळीच्या किराणा साहित्याच्या किटचे वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे अनेक गरजू कुटुंबांच्या दिवाळीत आनंदाची भर पडली.

महाराष्ट्र राज्याचे उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून, बीड जिल्हाप्रमुख सचिन मुळूक साहेब तसेच केज तालुकाप्रमुख अण्णासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला.

विशेष म्हणजे, केवळ औपचारिक कार्यक्रम न घेता कृष्णा परबळे, आदित्य ठोके, प्रथमेश खोमणे व त्यांच्या सहकाऱ्यांनी थेट गरजूंच्या दारापर्यंत पोहोचण्याचा निर्णय घेतला. गावातील दिव्यांग, वयोवृद्ध आणि निराधार नागरिकांची भेट घेऊन त्यांना किराणा साहित्याच्या किट देण्यात आल्या. सणाच्या काळात मिळालेल्या या मदतीमुळे लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर समाधान आणि आनंद दिसून आला.

या कार्यक्रमाला मंगेश चिवटे साहेबांचे निकटवर्तीय शिवराज आंधळकर सर तसेच अपंग संघटनेचे अध्यक्ष विशाल नाळपे यांची उपस्थिती होती. त्यांच्या उपस्थितीत हा सामाजिक उपक्रम पार पडला.

पदापेक्षा माणुसकीला प्राधान्य; युवकांच्या पुढाकाराची चर्चा

सामाजिक कार्य करताना प्रसिद्धीपेक्षा गरजूंच्या चेहऱ्यावरील समाधान महत्त्वाचे असते, याचा प्रत्यय या उपक्रमातून आला. गावातील गरजू नागरिकांपर्यंत प्रत्यक्ष पोहोचून त्यांची दिवाळी आनंदाची करण्यासाठी पुढाकार घेतल्याबद्दल कृष्णा परबळे, आदित्य ठोके आणि प्रथमेश खोमणे यांचे नांदूर घाटसह परिसरातील नागरिकांकडून कौतुक होत आहे.

राजकारणासोबतच सामाजिक बांधिलकी जपणारे स्थानिक युवक समाजाच्या सुख-दुःखात सहभागी होत असल्याचे या उपक्रमातून दिसून आले. विशेषतः दिव्यांग आणि वयोवृद्ध नागरिकांना सणासुदीच्या काळात दिलेला मदतीचा हात हा समाजासाठी सकारात्मक संदेश देणारा ठरला.

गरजूंच्या घरापर्यंत पोहोचलेला मदतीचा हात, हाच खऱ्या अर्थाने दिवाळीचा प्रकाश!

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

सर्व बातम्या

Recent Comments