स्वामी विवेकानंद विद्यामंदिरात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार; ३० विद्यार्थ्यांचा गौरव, सीसीटीव्ही नियंत्रण कक्षाचे उद्घाटन

Spread the love

केज डिजिटल बीड प्रतिनिधी | दि. १७ ऑगस्ट

जीवन विकास शिक्षण मंडळ, केज संचलित स्वामी विवेकानंद विद्यामंदिर (माध्यमिक विभाग) येथे स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून विविध स्पर्धा व परीक्षांमध्ये उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ उत्साहात पार पडला. शाळेच्या विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षा, वक्तृत्व व वादविवाद स्पर्धा, एमटीएस ऑलंपियाड तसेच अक्षरगंगा प्रज्ञाशोध परीक्षेत मिळवलेल्या यशाबद्दल एकूण ३० विद्यार्थ्यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

याच कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांची सुरक्षितता आणि शाळेतील शैक्षणिक वातावरण अधिक सुरक्षित करण्याच्या दृष्टीने शाळेच्या वर्गखोल्या तसेच इतर महत्त्वाच्या ठिकाणी बसविण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या नियंत्रण कक्षाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

ध्वजारोहणाने कार्यक्रमाची सुरुवात

स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाची सुरुवात शाळेच्या मुख्याध्यापिका शिवनंदा मुळे यांच्या हस्ते ध्वजारोहणाने झाली. यावेळी जीवन विकास शिक्षण मंडळाचे सचिव जी. बी. गदळे, कोषाध्यक्ष फजिलोद्दीन काजी, शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा शैलाताई इंगळे, स्वामी विवेकानंद विद्यामंदिर माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका शिवनंदा मुळे, स्व. प्रमोद महाजन महाविद्यालयाचे प्राचार्य शंकर भैरट, स्वयंअर्थसहायित शाळेचे मुख्याध्यापक अविनाश कराड, सेवानिवृत्त मुख्याध्यापक बाळासाहेब तिडके, सेवानिवृत्त सहशिक्षक हनुमंत घाडगे यांच्यासह शिक्षक, विद्यार्थी आणि पालक उपस्थित होते.

ध्वजारोहणानंतर शाळेतील कलाशिक्षक भालचंद्र केजकर आणि विद्यार्थ्यांनी मान्यवरांच्या उपस्थितीत ‘विश्वशांतीचे अन् समतेचे ब्रीद आपुले राखू या’ हे ध्वजगीत सादर केले. यामुळे कार्यक्रमाला देशभक्तीमय वातावरण प्राप्त झाले.

३० गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव

कार्यक्रमाच्या पुढील सत्रात विविध स्पर्धा व परीक्षांमध्ये यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये इयत्ता सातवी व आठवी शिष्यवृत्ती परीक्षेतील ५ विद्यार्थी, वक्तृत्व व वादविवाद स्पर्धेतील ५ विद्यार्थी, एमटीएस ऑलंपियाड परीक्षेतील राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय गुणवत्ता यादीतील १६ विद्यार्थी, तर अक्षरगंगा प्रज्ञाशोध परीक्षेतील ४ विद्यार्थी, अशा एकूण ३० विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.शिष्यवृत्ती परीक्षेत इयत्ता सातवीतील लटपटे आर्या राजेंद्र हिने पात्रता मिळवली. तर इयत्ता आठवीतील मुंडे आर्यन अंगद, सांजूरे पार्थ दीपक, भराडे सुधांशू अंगद आणि चोले पियुष बाळकृष्ण यांनी यश मिळवले.या विद्यार्थ्यांना सातवी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी सहशिक्षक मुंडे सर, समुद्रे सर, इरे मॅडम आणि उनवणे मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले. आठवी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी विभागप्रमुख डांगे सर, समुद्रे सर, घाडगे मॅडम आणि इरे मॅडम यांनी मार्गदर्शन केले.

वक्तृत्व व वादविवाद स्पर्धेत विद्यार्थ्यांचे उल्लेखनीय यश

कै. भास्करराव शिनगारे यांच्या २७ व्या पुण्यस्मरणानिमित्त धारूर येथे आयोजित मराठवाडा पातळीवरील वक्तृत्व व वादविवाद स्पर्धेतही स्वामी विवेकानंद विद्यामंदिरच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली.इयत्ता पाचवी ते सातवी गटातील स्वरा विठ्ठल बोराडे हिने सलग चार वर्षे प्रथम क्रमांक मिळवून ३ हजार रुपये रोख पारितोषिक, ढाल आणि प्रमाणपत्र पटकावले. धनश्री महादेव नेहरकर आणि तृप्ती चैतन्य देशमुख यांनी उत्तेजनार्थ पारितोषिक मिळवले.वादविवाद स्पर्धेच्या इयत्ता आठवी ते दहावी गटात केदार वैष्णवी विनायक आणि सूर्यवंशी आदित्य हनुमंतराव यांनी सलग तीन वर्षे प्रथम क्रमांक मिळवला. या विद्यार्थ्यांना ६ हजार रुपये रोख पारितोषिक, ढाल आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. या यशस्वी विद्यार्थ्यांना सहशिक्षक दत्ता सत्वधर सर यांचे मार्गदर्शन लाभले.

एमटीएस ऑलंपियाडमध्ये राज्य व जिल्हास्तरीय यश

एमटीएस ऑलंपियाड परीक्षेतही शाळेच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली. मुंडे आर्यन अंगद याने इयत्ता आठवीत राज्यस्तरावर १४ वा क्रमांक मिळवला. नेहरकर यशश्री सतीश हिने जिल्ह्यातून ९ वा क्रमांक मिळवला.तसेच चाळक अनुज राहुल याने केंद्रातून ५ वा, चाटे ओमकार सूर्यकांत ४ था, घुले क्रांती मकरंद ८ वी, गायकवाड प्रार्थना सुनील ९ वी, सावंत आर्यन अतुल ५ वा, बावगे वेदांत महादेव ६ वा, सोळुंके किरण बळीराम १३ वा, लामतुरे रणवीर मन्मथ ७ वा, काकडे प्रतीक पोपट १५ वा, लांब रूपाली शिवराज ९ वी, लटपटे आर्या राजेंद्र २ री, बोराडे स्वरा विठ्ठल १८ वी, शेटे सक्षम मिलिंद १० वा आणि वडगावकर आरोही अभिजीत २० वी अशी केंद्रस्तरीय गुणवत्ता मिळवली.या विद्यार्थ्यांना सहशिक्षक बी. एम. टिंगरे सर यांचे मार्गदर्शन लाभले.

अक्षरगंगा परीक्षेतही विद्यार्थ्यांची चमक

अक्षरगंगा प्रज्ञाशोध परीक्षेत लटपटे आर्या राजेंद्र हिने ३०० पैकी २३६ गुण मिळवले. घोळवे गुंजन धनंजय हिने १९८, चाळक अनुज राहुल याने १९२, तर घोळवे ऋतुजा राजाभाऊ हिने १७६ गुण मिळवून उल्लेखनीय कामगिरी केली. या विद्यार्थ्यांना सहशिक्षक रामराव शेप सर यांचे मार्गदर्शन लाभले.

विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही व्यवस्थाकार्यक्रमाच्या शेवटी शाळेच्या वर्गखोल्या तसेच इतर महत्त्वाच्या ठिकाणी बसविण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या नियंत्रण कक्षाचे उद्घाटन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. विद्यार्थ्यांची सुरक्षितता, शाळेतील शिस्त आणि परिसरातील विविध घडामोडींवर देखरेख ठेवण्यासाठी ही व्यवस्था महत्त्वाची ठरणार आहे.

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेसोबतच त्यांच्या सुरक्षिततेलाही प्राधान्य देण्याच्या दृष्टीने शाळेने केलेल्या या उपक्रमाचे उपस्थितांनी कौतुक केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक विभागप्रमुख प्रबोधकांत समुद्रे यांनी केले. तर आभार शाळेच्या मुख्याध्यापिका शिवनंदा मुळे यांनी मानले. शिक्षकांच्या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धांमध्ये मिळवलेले यश हे शाळेच्या शैक्षणिक वाटचालीतील महत्त्वपूर्ण यश असल्याचे यावेळी उपस्थितांनी नमूद केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *