ग्रंथप्रदर्शन, भाषण, ग्रंथवाचन, कथाकथन, परिसंवाद, काव्यवाचनासह विविध स्पर्धांना उत्स्फूर्त प्रतिसाद
केज/प्रतिनिधी
: स्वानंद सार्वजनिक वाचनालय, आनंदगाव (ता. केज, जि. बीड) येथे १५ ऑगस्ट २०२६ रोजी ८०वा भारतीय स्वातंत्र्यदिन विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सकाळी ८ ते रात्री ८ या वेळेत ग्रंथप्रदर्शन, उत्स्फूर्त भाषण, ग्रंथवाचन, कथाकथन, परिसंवाद, चर्चासत्र, व्याख्यान, काव्यवाचन आणि बक्षीस वितरण असे विविध कार्यक्रम घेण्यात आले.
सकाळी ८ वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत ग्रंथप्रदर्शनासह परिसंवाद, चर्चासत्र व इतर कार्यक्रमांचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच सौ. अंजना गोविंद गायकवाड होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून ग्रामपंचायत अधिकारी डी. एस. सरवदे, उपसरपंच सौ. आशा शंकर शिंदे, शिवाजी नाना गायकवाड, सुंदर पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
स्वानंद सार्वजनिक वाचनालय हे आनंदगावचे भूषण व वैभव असून, ग्रंथालय चळवळीसाठी दिशादर्शक ठरत असल्याचे प्रतिपादन ग्रामपंचायत अधिकारी डी. एस. सरवदे यांनी केले. गेल्या ३० वर्षांपासून अंगणवाडीतील विद्यार्थ्यांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत समाजातील सर्व घटकांना मोफत वाचनसेवा देण्याबरोबरच विविध सांस्कृतिक उपक्रमांच्या माध्यमातून वाचनालय सर्वसमावेशक कार्य करत असल्याचे उपसरपंच सौ. आशा शंकर शिंदे यांनी सांगितले.
अध्यक्षीय समारोपात सरपंच सौ. अंजना गोविंद गायकवाड यांनी स्वानंद सार्वजनिक वाचनालय हे गावाच्या सर्वांगीण विकासाला प्रेरणा देणारे प्रेरणास्थान, मार्गदर्शक आणि दिशादर्शक असल्याचे प्रतिपादन केले. त्यानंतर मान्यवरांच्या उपस्थितीत चर्चासत्र व परिसंवाद घेण्यात आला. डॉ. वसुदेव बप्पा गायकवाड यांचे व्याख्यानही यावेळी झाले.
दुपारनंतर शालेय विद्यार्थ्यांसाठी उत्स्फूर्त भाषण, ग्रंथवाचन, कथाकथन आणि काव्यवाचन स्पर्धा घेण्यात आल्या. उत्स्फूर्त भाषण स्पर्धेत यशराज भोगजकर यांनी प्रथम, सोहम गायकवाड यांनी द्वितीय, तर वेदिका गायकवाड यांनी तृतीय क्रमांक मिळविला.
ग्रंथवाचन उपक्रमात अजिंक्य श्रीकृष्ण तट, ज्ञानेश्वरी गायकवाड, मयुरी गायकवाड, वेदिका गायकवाड, यशराज भोगजकर, सोहम गायकवाड यांच्यासह अनेक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. कथाकथन स्पर्धेत सोहम गायकवाड यांनी प्रथम, अजिंक्य तट यांनी द्वितीय, वेदिका गायकवाड यांनी तृतीय, तर यशराज भोगजकर यांनी चतुर्थ क्रमांक मिळविला. काव्यवाचन स्पर्धेत यशराज भोगजकर प्रथम, वेदिका गायकवाड द्वितीय, तर सोहम गायकवाड यांनी तृतीय क्रमांक मिळविला.
या विविध कार्यक्रमांना शालेय विद्यार्थी, मुख्याध्यापक, शिक्षक, वाचक, युवक आणि ज्येष्ठ नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला. संजय सोनवणे, रामराव गायकवाड, प्रदीप कदम, बन्सीनाना गायकवाड, रामराजे गायकवाड (माजी सरपंच), बालासाहेब गायकवाड, सुधीर गायकवाड, बाळासाहेब गायकवाड, प्रतिक गायकवाड, बबन पुंड, ए. बी. गायकवाड, नागेश्वर वैरागे, ताराचंद गायकवाड, शिवाजी गायकवाड, दादासाहेब गायकवाड, शंकर भोगजकर, नारायण गायकवाड, दत्तात्रय गायकवाड, ऑपरेटर विजय थोरात, रामकृष्ण तात्या गायकवाड, बजरंग गायकवाड, ज्ञानेश्वर गायकवाड, कमलाकर साबळे, रामदास राऊत, सेवानिवृत्त मुख्याध्यापक छगन नाना गायकवाड, रविंद्र गायकवाड (पेंटर), रमेशराव गायकवाड, शिवाजी घोगले, बिरु सौदागर, रामचंद्र नांदे, शिवदास गायकवाड, ग्रामपंचायत सदस्य नारायण गायकवाड, तात्या गायकवाड, हरिभाऊ गायकवाड, गोविंद गायकवाड, सर्जेराव गायकवाड, सुखदेव गायकवाड यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक, सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन स्वानंद सार्वजनिक वाचनालयाचे व्यवस्थापकीय प्रमुख आनंद भैय्या गायकवाड यांनी केले.