Friday, October 9, 2026
Homeनोकरीपावनधामच्यां महाद्वारासाठी श्रीगुरु पुंडलिक महाराज देहुकर यांची ₹४ लाख ३१ हजारांची देणगी...

पावनधामच्यां महाद्वारासाठी श्रीगुरु पुंडलिक महाराज देहुकर यांची ₹४ लाख ३१ हजारांची देणगी घोषणा

Spread the love

डिजिटल बीड प्रतिनिधी

धोंडे भोजन सोहळ्यात हजारो भाविकांची उपस्थिती; पावनधामच्या महाद्वारासाठी श्रीगुरु पुंडलिक महाराज देहुकर यांची ₹४ लाख ३१ हजारांची देणगी घोषणा श्री जगद्गुरु तुकोबाराय पावनधाम संस्थान, औरंगपूर येथे अधिक मासानिमित्त आयोजित अखंड हरिनाम सप्ताहा च्या सांगता सोहळ्या निमित्त रविवारी भव्य धोंडे भोजन सोहळा पावनधामचे संस्थापक अध्यक्ष ह.भ.प.महादेव महाराज बोराडे शास्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली उत्साहात पार पडला.या भक्तिमय कार्यक्रमास हजारो भाविकांनी उपस्थित राहून हरिनामाचा आनंद लुटला.यावेळी जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचे तेरावे वंशज,ह.भ.प. श्रीगुरु पुंडलिक महाराज देहुकर यांचे काल्याचे कीर्तन संपन्न झाले.

आपल्या कीर्तनातून त्यांनी संत तुकाराम महाराजांच्या विचारांचा जागर करत सेवा, माणुसकी आणि समाज हिताचा संदेश दिला. त्यांच्या प्रभावी निरूपणाने उपस्थित भाविक मंत्रमुग्ध झाले.कीर्तनादरम्यान श्रीगुरु पुंडलिक महाराज देहुकर यांनी संस्थानच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण घोषणा करत पावनधाम येथील महाद्वार उभारणी साठी ₹ ४ लाख ३१ हजारांची देणगी जाहीर केली.वर्षभराच्या आत हे प्रवेशद्वार उभारण्यात यावे,अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. त्यांच्या या उदार घोषणेचे उपस्थित भाविकांनी टाळ्यांच्या कडकडाटात स्वागत केले.यानंतर आयोजित करण्यात आलेल्या धोंडे भोजन सोहळ्यात हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.धोंडे जेवणाचे यजमानपद उद्योजक नामदेव इंदरराव गोरे, भास्कर नागोराव आगळे,प्रकाश बंडगर, भानुदासराव करपे, अनिल लक्ष्मणराव पिंपळे आणि सतीश पंढरीनाथ शिंदे यांनी घेतले.संपूर्ण परिसर हरिनाम,अभंग आणि भक्तीमय वातावरणाने भारावून गेला होता.

भक्ती,सेवा आणि समाजकार्याचा सुंदर संगमघडवून आणणाऱ्या या सोहळ्यामुळे भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. श्रीगुरु पुंडलिक महाराज देहुकर यांच्या देणगी घोषणेमुळे पावनधामच्या विकासाला नवी गती मिळणार असल्याची भावना उपस्थित भाविकांनी व्यक्त केली.

digitalbeed
digitalbeedhttp://digitalbeed.in
DigitalBeed.in हे बीड जिल्हा तसेच महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी, स्थानिक बातम्या, सरकारी योजना, शेती, शिक्षण, नोकरी आणि तंत्रज्ञान विषयक माहिती देणारे मराठी डिजिटल न्यूज पोर्टल आहे. आमचे उद्दिष्ट वाचकांपर्यंत अचूक, विश्वासार्ह आणि जलद बातम्या पोहोचवणे आहे. बीड जिल्ह्यातील केज, माजलगाव, अंबाजोगाई, परळी, गेवराई, आष्टी आणि इतर भागातील स्थानिक घडामोडी आम्ही सातत्याने प्रसिद्ध करतो. ताज्या अपडेटसाठी DigitalBeed.in नियमित वाचा आणि आमच्या सोशल मीडियावर देखील जोडलेले राहा.
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

सर्व बातम्या

Recent Comments