Friday, October 9, 2026
Homeबीड जिल्हा​बीड हादरले! रानडुकरांच्या भीषण हल्ल्यात ५ शेतकरी गंभीर जखमी; शिंदी-गप्पेवाडी परिसरात दहशतीचे...

​बीड हादरले! रानडुकरांच्या भीषण हल्ल्यात ५ शेतकरी गंभीर जखमी; शिंदी-गप्पेवाडी परिसरात दहशतीचे वातावरण ?

Spread the love

डिजिटल बीड प्रतिनिधी

बीडच्या केज तालुक्यात रानडुकरांचा धुमाकूळ; शेतात गेलेल्या शेतकऱ्यांवर जीवघेणा हल्ला.

बीड: जिल्हयातील केज तालुक्यातील शिंदी आणि गप्पेवाडी परिसरात रानडुकरांनी उच्छाद मांडला आहे. आज सकाळी शेतात कामासाठी गेलेल्या ५ शेतकऱ्यांवर रानडुकरांच्या कळपाने अचानक भीषण हल्ला केला. या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, शेतकरी नेहमीप्रमाणे शेतात कृषी काम करत असताना अचानक रानडुकरांच्या मोठ्या कळपाने त्यांच्यावर हल्ला चढवला. अचानक झालेल्या या भीषण हल्ल्यात अनेक शेतकरी गंभीर जखमी झाले असून काहींची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे. जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर दणाणून गेला आणि ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना तातडीने बाहेर काढले.

स्थानिक नागरिकांनी वेळेवर मदत करत जखमींना बीड, अंबाजोगाई, केज आणि विडा येथील विविध रुग्णालयांत उपचारासाठी दाखल केले. यातील एका शेतकऱ्याची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याने नातेवाईकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांनी प्रशासनाकडे रानडुकरांचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी केली.

वाढता दबाव आणि ग्रामस्थांचा संताप लक्षात घेता वनविभागाने तातडीने रेस्क्यू ऑपरेशन राबवत संबंधित रानडुक्कराला पकडून ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे.तरीही वारंवार होत असलेल्या रानडुकरांच्या हल्ल्यांमुळे केज तालुक्यातील शेतकरी दहशतीखाली जीवन जगत आहेत.

सतत होणाऱ्या वन्यप्राण्यांच्या हल्ल्यामुळे आता शेतात जायचे कसे? असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे.

जखमी शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत द्यावी तसेच भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

आता प्रशासन आणि वनविभाग यापुढे कोणती ठोस पावले उचलणार याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

digitalbeed
digitalbeedhttp://digitalbeed.in
DigitalBeed.in हे बीड जिल्हा तसेच महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी, स्थानिक बातम्या, सरकारी योजना, शेती, शिक्षण, नोकरी आणि तंत्रज्ञान विषयक माहिती देणारे मराठी डिजिटल न्यूज पोर्टल आहे. आमचे उद्दिष्ट वाचकांपर्यंत अचूक, विश्वासार्ह आणि जलद बातम्या पोहोचवणे आहे. बीड जिल्ह्यातील केज, माजलगाव, अंबाजोगाई, परळी, गेवराई, आष्टी आणि इतर भागातील स्थानिक घडामोडी आम्ही सातत्याने प्रसिद्ध करतो. ताज्या अपडेटसाठी DigitalBeed.in नियमित वाचा आणि आमच्या सोशल मीडियावर देखील जोडलेले राहा.
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

सर्व बातम्या

Recent Comments