Tuesday, November 24, 2026
HomeUncategorizedपिंपळगव्हाणमध्ये जलतारा प्रकल्पाचे उद्घाटन; भूजल संवर्धनाला बळ

पिंपळगव्हाणमध्ये जलतारा प्रकल्पाचे उद्घाटन; भूजल संवर्धनाला बळ

Spread the love

केज/प्रतिनिधी

केज तालुक्यातील पिंपळगव्हाण येथे विकसित भारत जी राम जी योजनेअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या जलतारा (भूजल पुनर्भरण) प्रकल्पाचा भव्य उद्घाटन सोहळा शुक्रवार,दिनांक २० नोव्हेंबर २०२६ रोजी उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.यावेळी उपस्थित ग्रामस्थांना मार्गदर्शन करताना गटविकास अधिकारी श्री.विठ्ठल नागरगोजे साहेब यांनी जलतारा प्रकल्पाचे महत्त्व विशद केले.ते म्हणाले की,आजच्या काळात पाण्याचे संवर्धन आणि भूजलपातळी वाढविणे ही काळाची गरज आहे.

पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात वाहून जाते.हेच पाणी योग्य नियोजनातून जमिनीत मुरविल्यास भूजल पुनर्भरणास मदत होऊ शकते.त्यासाठी जलतारा प्रकल्पा सारखे जलसंधारणाचे उपक्रम अत्यंत उपयुक्त आहेत.प्रत्येक शेतकऱ्याने आपल्या शेतातील पावसाचे पाणी अडवून ते जमिनीत जिरविण्या साठी पुढाकार घ्यावा.

केवळ शासनाच्या माध्यमातून नव्हे,तर ग्रामस्थांच्या लोक सहभागातून जल संधारणाची चळवळ उभी राहणे आवश्यक आहे.पाणी अडवा, पाणी जिरवा हा विचार प्रत्यक्ष कृतीत उतरविल्यास भविष्यात पाणी टंचाई वर मात करण्यास मदत होईल,असे त्यांनी सांगितले.पिंपळगव्हाण ग्रामपंचायतीने जलसंधारणाच्या दृष्टीने जलतारा प्रकल्पाचा पुढाकार घेतला असून, या उपक्रमात ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांनी सक्रिय सहभाग नोंदवावा,असे आवाहनही त्यांनी केले.

गावाच्या शाश्वत विकासासाठी जल संधारण ही सामूहिक जबाबदारी असून, प्रत्येकाने पाण्याचा प्रत्येक थेंब जमिनीत जिरविण्याचा संकल्प करावा,असा संदेश त्यांनी आपल्या मनोगतातून दिला.या उद्घाटन सोहळ्यास आमदार अंबाजोगाईचे नगराध्यक्ष श्री. नंदकिशोरजी मुंदडा काकाजी,उपविभागीय अधिकारी श्री.दीपक वजाळे,तहसीलदार श्री.अशोक भंडारे, गटविकास अधिकारी श्री.विठ्ठल नागरगोजे, सहाय्यक गट विकास अधिकारी श्री. अभिमान राठोड, पंचायत विभागाचे विस्तार अधिकारी, सरपंच सचिन गायकवाड,उप सरपंच शेलाजी घोळवे, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामपंचायतअधिकारी, ग्रामरोजगार सहाय्यक, कर्मचारी तसेच मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

पिंपळगव्हाण ग्रामपंचायतीच्या पुढाकारातून सुरू झालेला हा जलसंधारणाचा उपक्रम गावाला पाणीदार बनविण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार आहे.

digitalbeed
digitalbeedhttp://digitalbeed.in
DigitalBeed.in हे बीड जिल्हा तसेच महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी, स्थानिक बातम्या, सरकारी योजना, शेती, शिक्षण, नोकरी आणि तंत्रज्ञान विषयक माहिती देणारे मराठी डिजिटल न्यूज पोर्टल आहे. आमचे उद्दिष्ट वाचकांपर्यंत अचूक, विश्वासार्ह आणि जलद बातम्या पोहोचवणे आहे. बीड जिल्ह्यातील केज, माजलगाव, अंबाजोगाई, परळी, गेवराई, आष्टी आणि इतर भागातील स्थानिक घडामोडी आम्ही सातत्याने प्रसिद्ध करतो. ताज्या अपडेटसाठी DigitalBeed.in नियमित वाचा आणि आमच्या सोशल मीडियावर देखील जोडलेले राहा.
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

सर्व बातम्या

Recent Comments